Virat Kohli IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 42 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. आणि अखेर त्याच्या घरच्या मैदानावर धावांचा दुष्काळ संपवला. या हंगामात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या गेल्या तीन सामन्यांमध्ये विराट कोहली अपयशी ठरला होता, परंतु या सामन्यात त्याने जोरदार पुनरागमन केले. याशिवाय, त्याने या हंगामात एक अर्धशतकही झळकावले आहे. यासोबतच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जे कोणत्याही फलंदाजासाठी मोडणे खूप कठीण आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमवर गेल्या तीन सामन्यांमध्ये विराट कोहलीला फक्त 30 धावा करता आल्या होत्या. पण त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध जबरदस्त पुनरागमन केले आणि अर्धशतक ठोकले ज्यामुळे चाहते पण खुश झाले. यासह, विराट कोहलीने आता टी-20 क्रिकेट इतिहासात प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक धावा (50 पेक्षा जास्त) करण्याचा विक्रम केला आहे. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने 62 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
यानंतर पाकिस्तानचा बाबर आझम येतो. त्याने हा पराक्रम 61 वेळा केला आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने 57 वेळा प्रथम फलंदाजी करताना 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 55 वेळा ही कामगिरी केली आहे. इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरने 52 वेळा आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसनेही 52 वेळा हा पराक्रम केला आहे.
विराट कोहलीने ख्रिस गेलला टाकले मागे
यासह कोहली टी-20 मध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी-20 मध्ये 50 पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत त्याने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलने 110 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या. विराट कोहलीने 111 वेळा 50+ धावा केल्या आहेत. या बाबतीत अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने 117 वेळा हे केले आहे. जोस बटलरने 95 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या हंगामात, विराट कोहलीने 9 सामन्यांच्या 9 डावात 77.00 च्या सरासरीने 385 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे.