Royal Challengers Bengaluru vs Rajasthan Royals : आयपीएल 2025 च्या 42 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या हंगामात चिन्नास्वामीवर आरसीबीला एकही विजय मिळालेला नाही. रजत पाटीदारच्या संघाने या हंगामात घरच्या मैदानावर 3 सामने खेळले आहेत आणि तिन्हीही सामने गमावले आहेत. यापूर्वी, जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा आरसीबीने विजय मिळवला होता. आता राजस्थानला बदला घ्यायचा असेल. 

पुन्हा एकदा घरच्या मैदानावर नाणेफेक हरली आरसीबी!

पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू घरच्या मैदानावर नाणेफेक हरली. बंगळुरूमध्ये सलग चौथ्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक गमावली आहे. राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघात एक बदल करण्यात आला आहे आणि महिश तीक्षनाऐवजी फजलहक फारुकीला संघात स्थान देण्यात आले आहे. बंगळुरू संघात कोणताही बदल नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची प्लेइंग-11 : फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल.

इम्पॅक्ट प्लेयर : सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग.

राजस्थान रॉयल्स संघाची प्लेइंग-11 : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, फजलहक फारुकी, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.

इम्पॅक्ट प्लेयर : वैभव सूर्यवंशी, युधवीर सिंग चरक, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, कुणाल सिंग राठौर.

आतापर्यंत आरसीबीने आयपीएल 2025 मध्ये 5 सामने खेळले आहेत. या काळात संघाने पाच सामने जिंकले आहेत. तर त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. संघाचा नेट रन रेट +0.4725 आहे. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी आठ पैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे.