SRH vs RCB : रनमशीन विराट कोहलीला विक्रमांचा बादशाह म्हटलं जाते. आयपीएल असो अथवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट.. विराट कोहलीच्या नावावर एकापेक्षा एक विक्रम आहेत. आयपीएलमध्ये आरसीबीचा संघ खराब कामगिरीमुळे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाण्याच्या स्थितीत आहे, पण दुसरीकडे विराट कोहली मात्र आपलं काम चोख बजावत आहे. विराट कोहलीनं यंदाच्या हंगामात 400 धावांचा पल्ला पार केलाय. यंदाच्या हंगामात 400 धावा करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज आहे. विराट कोहलीच्या आसपासही कुणी नाही. यंदाच्या हंगामातील ऑरेंज कॅपही विराट कोहलीकडेच आहे. विराट कोहलीनं 400 धावांचा पल्ला पार करताच मोठा विक्रम नावावर झालाय. विराट कोहलीने आयपीएलच्या 10 हंगामात 400 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. दहा हंगामात 400 पेक्षा जास्त धावा कऱणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज ठरलाय. 


विराट कोहलीनं 10 हंगामात 400 पेक्षा जास्त धावा केल्या - 


आयपीएल 2008 पासून विराट कोहली आरसीबीसाठी खेळत आहे. विराट कोलीने 2011 मध्ये पहिल्यांदा 400 धावांचा पल्ला गाठला होता. त्यानं 16 सामन्यात 557 धावांचा पाऊस पाडला होता.  त्यानंतर 2012, 2014, 2017 आणि 2022 या चार हंगामात विराट कोहलीला 400 धावांचा पल्ला पार करता आला नाही. म्हणजेच, 2008,2009,2010, 2012, 2014, 2017 आणि 2022 या सात हंगामात विराट कोहलीला 400 धावांचा पल्ला पार करता आला नाही. तर विराट कोहलीने 10 हंगामात 400 धावांचा टप्पा पार केला आहे. 




 
 2016 हंगामात 973 धावांचा पल्ला - 


आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्याच नावावर आहे. विराट कोहलीने 2016 आयपीएल हंगामात 16 सामन्यात 81 च्या सरासरीने 973 धावा जमवल्या होत्या. त्या हंगामात विराटने 7 अर्धशतके आणि 4 शतक ठोकली होती.  IPL 2016 देखील स्ट्राइक रेटच्या बाबतीत विराट कोहलीसाठी सर्वोत्तम ठरला. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती, जेव्हा कोहलीने संपूर्ण हंगामात 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.


यंदा 400 धावा करणारा पहिला फलंदाज - 


यंदाच्या हंगामात 400 धावांचा टप्पा पार कऱणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरलाय. विराट कोहलीने 9 सामन्यात 430 धावांपर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं 9 सामन्यात 349धावा केल्या आहेत. विराट कोहलीने हैदराबादविरोधात 51 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 9 सामन्यात 146 च्या स्ट्राईक रेटने 430 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकाचा समावेश आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 40 चौकार लगावलेत तर 17 षटकार ठोकले आहेत.