Arjun Tendulkar IPL Records : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर तीन वर्षांपासून बेंचवर होता..तेव्हाही तो चर्चेत होता. त्यानंतर यंदा त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले.. तेव्हाही तो चर्चेत आहे. कधी आयपीएल पदार्पणामुळे, कधी पहिल्या विकेटमुळे तर कधी एका षटकात ३१ धावा दिल्यामुळे अन् कधी यॉर्कर गोलंदाजीमुळे अर्जुन तेंडुलकर चर्चेत राहिलाय. आता तो षटकारामुळे चर्चेत आहे. गुजरातविरोधात अर्जुन तेंडुलकर याने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर षटकार लगावला. याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. 

२०८ धावांचा पाठलाग करताना मुंबईची अवस्था दैयनिय झाली. रोहित शर्मा, ईशान किशन, टिम डेविड आणि कॅमरुन ग्रीन यासारखे स्टार फलंदाज लवकर तंबूत परतले. मुंबईचा डाव गडगडला त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला मैदानात यावे लागले. अर्जुन तेंडुलकर याने तळाला दमदार फलंदाजी केली. अर्जुन तेंडुलकर याने मोहित शर्मा याला लगावलेला षटकार चर्चेचा विषय आहे. अर्जुन तेंडुलकर याला षटकार लगावल्यानंतर मोहित शर्मा यालाही विश्वास बसला नाही. मोहित शर्माच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. अर्जुन याने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही योगदान दिले. अर्जुन तेंडुलकर याने नऊ चेंडूत १३ धावांची खेळी केली. यामध्ये एका षटकाराचा समावेश होता. याच षटकाराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. पहिल्यांदाच फलंदाजीसाठी उतरलेला अर्जुनची नेटकरी चर्चा करत आहेत.

सामन्यात काय झाले?IPL 2023 Points Table : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातने मुंबईचा 55 धावांनी दारुण पराभव केला. मुंबईचा पराभव करत गुजरातने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने यंदा दमदार कामगिरी केली आहे. गुजरातने सात सामन्यात पाच विजय मिळवत दहा गुणांची कमाई केली आहे. दहा गुणांसह गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ दहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातपेक्षा चेन्नईच्या संघाचा नेट रेनरेट सरस आहे. त्यामुळे समान गुण असतानाही चेन्नईचा संघ पहिल्याच स्थानावर आहे. चेन्नईने सात सामन्यात पाच विजय मिळवले आहेत.