Gujarat Titans vs Mumbai Indians : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर मंगळवारी मुंबई आणि गुजरात यांच्यात लढत झाली. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरातने मुंबईचा ५५ धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना सहा विकेटच्या मोबद्लयात २०७ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल मुंबईचा संघ १५२ धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यादरम्यान रोहित शर्मा याचे मैदानावरच राग अनावर आला. भरमैदानात रोहित शर्मा पीयूष चावलावर भडकला. फिल्डिंग करताना पीयूष चावलाकडून चूक झाली.. त्यामुळे रोहित शर्माचा राग अनावर झाला.. तो पीयूष चावलावर भडकला.
रोहित शर्मा भडकला -
गुजरातच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुभमन गिल, अभिनव मनोहर आणि डेविड मिलर यांनी धावांचा पाऊस पाडला. फिल्डिंग करताना रोहित शर्माचा राग अनावर आला. पीयूष चावलाच्या खराब फिल्डिंगमुळे गुजरातला चार धावा मिळाल्या. त्यामुळे रोहित शर्मा चांगलाच भडकला. गुजरातची फलंदाजी सुरु असताना १७ व्या षटकात हा प्रसंग घडला. राइली मेरेडिथ याने जबरदस्त यॉर्कर फेकला.. अभिनव मनोहर याने तो चेंडू थर्ड मॅनच्या दिशेला मारला.. तिथे पीयूष चावला फिल्डिंग करत होता.. त्याच्याकडून चेंडू सुटला अन् सीमारेषाबाहेर गेला. गुजरातच्या संघाला चार धावा मिळाल्या. या प्रकारानंतर रोहित शर्मा पीयूष चावलावर भडकला. पीयूष चावलाही खराब फिल्डिंगमुळे निराश होता.
सामन्यात काय झाले?
IPL 2023 Points Table : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातने मुंबईचा 55 धावांनी दारुण पराभव केला. मुंबईचा पराभव करत गुजरातने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने यंदा दमदार कामगिरी केली आहे. गुजरातने सात सामन्यात पाच विजय मिळवत दहा गुणांची कमाई केली आहे. दहा गुणांसह गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ दहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातपेक्षा चेन्नईच्या संघाचा नेट रेनरेट सरस आहे. त्यामुळे समान गुण असतानाही चेन्नईचा संघ पहिल्याच स्थानावर आहे. चेन्नईने सात सामन्यात पाच विजय मिळवले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अजिंक्य रहाणेला फक्त IPL मुळे संघात स्थान मिळाले नाही... रणजीमध्ये धावांचा पाडलाय पाऊस