Indian Cricket Team T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषकाला आवघे बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. टीम इंडियाचे शिलेदार विश्वचषकासाठी अेमरिकेत दाखल झालाय. रोहित शर्मा आणि कंपनी आयसीसी चषक उंचावण्यासाठी सज्ज झाली आहे. 2011 पासून भारतीय संघाला आयसीसी चषकाने हुलकावनी दिली आहे. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीमध्ये संपुष्टात आले होते. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ पुन्हा एकदा नव्या दमाने मैदानात उतरणार आहे. या विश्वचषकात भारतासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या पाच खेळाडूंबाबत जाणून घेऊया.. हे खेळाडू भारताला चषक उंचावून देऊ शकतात.  


1- विराट कोहली 


टी20 विश्वचषकात भारतासाठी विराट कोहली महत्वाचा खेळाडू ठरणार आहे. आतापर्यंत झालेल्या विश्वचषकात त्याने शानदार कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्येही विराट लयीत दिसला. वनडे वर्ल्डकप आणि 2022 टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर होता. विराट कोहलीने अनेकदा भारताला एकहाती सामना जिंकून दिलाय.


2- रोहित शर्मा


भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी20 विश्वचषकात हुकूम का एक्का ठरणार आहे. रोहित शर्मा सलामीची जबाबदारी पार पाडणार आहे. 2023 वनडे वर्ल्डकपप्रमाणे आक्रमक सुरुवात देण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असेल. रोहित शर्माने पॉवरप्लेमध्ये वादळी सुरुवात दिल्यास भारतीय संघाचं विश्वचषकात पारडं जड राहणार आहे. 


3- जसप्रीत बुमराह 


भारतीय संघाच्या वेगवान माऱ्याची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असेल. विश्वचषकात बुमराहच्या कामगिरीवर सर्वांच्या नजर असतील. बुमराह कोणत्याही खेळपट्टीवर भेदक मारा करु शकतो. त्यामुळे भारताला विश्वचषक जिंकायचा असेल, तर बुमराह फॉर्मात असणं गरजेचं आहे.  


4- सूर्यकुमार यादव


टी20 क्रिकेटचा नंबर एक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे यंदाच्या विश्वचषकात सर्वांच्या नजरा असतील. सूर्या कोणत्याही परिस्थितीमध्ये एकहाती सामना जिंकून देऊशकतो. सूर्या सध्या फॉर्मात आहे, त्याचा फायदा भारतीय संघाला होणऊ शकतो. 2022 टी20 विश्वच,कात सूर्यकुमार यादवने 239 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा त्याने चोपल्या होत्या. यंदाच्या विश्वचषकात त्याच्याकडून आणखी मोठ्या कामगिरीची आपेक्षा असेल.  


5- कुलदीप यादव 


चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याच्या कामगिरीवरही भारताचा विश्वचषकातील प्रवास अवलंबून असेल. कुलदीप भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून विश्वचषकात उतरणार आहे. कुलदीपचा फॉर्म भारतासाठी महत्वाचा असेल.