IPL : टी-20 क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाल्यानंतर हा प्रकार म्हणजे फलंदाजांसाठी अधिक भारी म्हटलं जात होतं. क्रिकेट जानकारांकडून देखील क्रिकेटच्या या फॉर्मेटमध्ये गोलंदाजांसाठी खास काही नाहीच असंच म्हटलं जात होतं. पण जसजसा वेळ पुढे गेला तसं गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे या फॉर्मेटमध्ये अनेक गोलंदाज नावारुपाला आले. आता देखील फलंदाजासह गोलंदाज टी20 सामना पलटवण्याची ताकद ठेवतात. टी20 क्रिकेटचा विचार करता या प्रकाराची सर्वात दमदार लीग म्हणजे आयपीएल. दरम्यान आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाजांचा विचार करता सर्वाधिक वेळा एका सामन्यात 4 विकेट घेणारे गोलंदाज कोण हे पाहुयात...
1. सुनील नारायण : IPL मध्ये वेस्टइंडिजचा स्टार फिरकीपटू सुनील नारायण 7 वेळा 4 विकेट मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळे तो या यादीत टॉपवर आहे. IPL मध्ये त्याने 134 सामन्यात 143 विकेट्स घेतल्या आहेत.
2. लसिथ मलिंगा : श्रीलंका संघाचा माजी स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएल कारकिर्दीत 6 वेळा एका सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या असून 170 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
3. अमित मिश्रा : माजी भारतीय फिरकीपटू अमित मिश्राने 4 वेळा IPL सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत. IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज तोच आहे. त्याने 166 विकेट्स घेतल्या आहेत.
4. ख्रिस मॉरिस : दक्षिण आफ्रीकेच्या या गोलंदाजाने 4 वेळाच आयपीएलमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. एकूण 95 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
5. कागिसो रबाडा : दक्षिण आफ्रीकेचा युवा स्टार कागिसो रबाडाने देखील 4 वेळा 4 विकेट्स घेतल्या असून त्याच्या नावावर एकूण 76 विकेट्स आहेत.
हे ही वाचा-
TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात 'या' पाच खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा, यादीत चार भारतीय फलंदाज
IPL 2022 : विराट कोहली पुन्हा येणार, आरसीबीचं कर्णधारपद कोहली सांभाळेल, आश्विनचा दावा
LSG signs Andrew Tye: लखनौच्या संघाला दिलासा, मार्क वूडने माघार घेतल्यानंतर धाकड ऑस्ट्रेलियन खेळाडूची संघात एन्ट्री
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha