IPL Marathi News: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आयपीएलमधील (IPL 2024) 'छुपा रुस्तम' संघाचे नाव जाहीर केले आहे. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात सुनील गावसकर यांनी सामना कधीही फिरवू शकणारा संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) असं म्हटलं आहे. 


गावसकर या कार्यक्रमात म्हणाले, केकेआर हा या आयपीएलमधील डार्क हॉर्स आहे. ते कधीही खेळाला कलाटणी देऊ शकतात. त्यांच्याकडे जबरदस्त फलंदाजी आहे. आंद्रे रसेलसारखा खेळाडू आहे, जो गेम चेंजर ठरू शकतो. रसेल सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. केकेआर एक मजबूत संघ आहे. श्रेयस अय्यरच्या आगमनाने संघ वेगळ्याच उंचीवर पोहचला आहे, असं सुनील गावसकर यांनी सांगितले.


सुनील गावस्कर यांनी गौतम गंभीरने केकेआरमधील पुनरागमन करण्याबद्दलही आपले मत व्यक्त केले. चंद्रकांत पंडित आणि गौतम गंभीर हे दोघं चमत्कार घडवू शकतात. दोघेही मजबूत व्यक्तिमत्त्व आहेत. दोघांमध्ये चांगला सामंजस्य आहे.हे खूप महत्वाचे असते. कारण दोघांमध्ये चांगला समन्वय असेल तर केकेआर नक्कीच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार बनेल, अशी भविष्यवाणी सुनील गावसकर यांनी केली.


दरम्यान, सुनील गावस्कर यांनी आयपीएल 2024च्या हंगामात स्टार बनू शकतील अशा दोन खेळाडूंची नावेही जाहीर केली. गावस्कर यांनी ध्रुव जुरेल आणि आकाश दीप यांची नावे घेतली आहेत. याबाबत गावसकर म्हणाले, "मला वाटते की, अलीकडच्या काळात जुरेलने ज्याप्रकारे फलंदाजी केली आहे त्यामुळे या आयपीएलमध्ये त्याला जास्त संधी मिळू शकते. आकाश दीपला जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे. आकाश दीप कसोटीच्या टप्प्यात त्याने आपली क्षमता दाखवली आहे, त्यामुळे यावेळी त्याला अधिक संधी मिळेल असं सुनील गावसकर म्हणाले.


केकेआरच्या (KKR) संघात कोणते खेळाडू?


श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, सुनील नरेन, जेसन रॉय, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, मुजीब उल रहमान, शेरफान. रदरफोर्ड, गस एटिंकसन, मनीष पांडे, केएस भरत, चेतन साकारिया, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, साकिब हुसेन.


संबंधित बातम्या:


IPL 2024: चेपॉकवर कोण कुणाला भारी? धोनीची चेन्नई की आरसीबी, आकडे काय सांगतात? जाणून घ्या


IPL 2024: सुनील शेट्टींचं जावईविरोधात बंड; रोहित शर्मानेही केएल राहुलला जेवणाच्या टेबलावर बसण्यास दिला नकार