SRH vs HCA IPL 2025 Controversy : एकेकडी इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. दुसरीकडे या लीगच्या लाँचिंगवरून एक मोठा वादही सुरू झाला आहे. हा वाद सनरायझर्स हैदराबाद आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील आहे जो बीसीसीआयपर्यंत पोहोचला आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ व्यवस्थापनाने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला (HCA) ईमेल लिहून धमकी दिली होती की ते हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सामना खेळणार नाहीत.
सनरायझर्स हैदराबादनी आरोप केला की क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांनी गैरवर्तन केले आहे आणि त्यांचे अध्यक्ष देखील त्यांच्याकडून सतत तिकिटांची मागणी करत आहेत. सनरायझर्स हैदराबादने याबाबत बीसीसीआयला ईमेलही पाठवला आहे. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने सनरायझर्स हैदराबादला खोटारडे म्हटले आहे.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने काव्या मारन संघाचं दावे फेटाळून....
एचसीएने एक प्रेस रिलीज जारी करून म्हटले आहे की, सनरायझर्स हैदराबाद खोटारडे आहेच. त्यांनी लिहिले, 'अॅपेक्स कौन्सिल स्पष्ट करते की एचसीए अध्यक्ष ए. जगन मोहन राव यांनी सामन्यासाठी वैयक्तिकरित्या तिकिटे खरेदी करण्याची कोणतीही मागणी केली नव्हती. 19 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीत अध्यक्षांनी क्लब सचिवांना तिकिटे देण्याचा प्रस्ताव मांडला होता.
ते पुढे म्हणाले, 'एसआरएच अधिकाऱ्यांनी एचसीए अध्यक्षांवर खोटे आरोप करणे अयोग्य आहे... आम्ही एसआरएचच्या सर्व अधिकाऱ्यांना सर्व समस्या सोडवण्यासाठी खुल्या मनाने पुढे येण्याची विनंती करतो. सनरायझर्स हैदराबाद ही काव्या मारनची टीम आहे, जी मारन कुटुंबाची मुलगी असण्यासोबतच एक मोठी उद्योगपती देखील आहे. प्रश्न असा आहे की, ती तिकिटांबद्दल खोटे बोलत आहे का?
एचसीएवर "ब्लॅकमेलिंग" केल्याचा आरोप
रविवारी 30 मार्च रोजी एसआरएचने बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती आणि एचसीएवर "ब्लॅकमेलिंग" केल्याचा आरोप केला होता. पण, क्रिकेट बोर्डाने एसआरएचने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. एचसीए सदस्यांनी एसआरएचला धमकी दिल्यानंतर आणि आयपीएल सामन्यांसाठी अधिक मोफत पासची मागणी केल्यानंतर वाद सुरू झाला.
शिवाय, असाही आरोप करण्यात आला की एसआरएच विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सामन्याच्या दिवशी, एचसीए अधिकाऱ्यांनी स्टेडियममधील एक बॉक्स लॉक केला, ज्यामुळे एसआरएचचा राग आणखी वाढला. आता एसआरएचचा पुढील होम मॅच 6 एप्रिल (रविवार) रोजी गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध खेळला जाणार आहे. हा वाद सामन्यापूर्वी मिटतो की आणखी वाढतो हे पाहणे मनोरंजक असेल.