Watch Video: इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूकनं (Alastair Cook )आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, त्यानं काऊंटी आणि लोकल क्रिकेट खेळणं सुरूच ठेवलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या ॲलिस्टर कूकची कारकिर्द उत्कृष्ट होती. ज्यावेळी ॲलिस्टर कूक फलंदाजी करण्यासाटी मैदानात यायचा, त्यावेळी त्याला बाद करताना गोलंदाजांना घाम फुटायचा. परंतु, एका पंधरा वर्षाचा गोलंदाजानं ॲलिस्टर कूकला क्लीन बोल्ड करून चर्चेत आला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, ॲलिस्टर कूक एका लोकल क्लबसाठी खेळत होता. त्यावेळी फक्त 15 वर्षाचा गोलंदाज कायरन शॅक्लटननं भेदक गोलंदाजी करत ॲलिस्टर कूकला क्लिन बोल्ड केलं. कूक क्लीन बोल्ड झाल्यानंतर सोशल मीडियावर कायरन शॅक्लटनची चर्चा रंगली आहे. तसेच कूक बोल्ड झाल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. क्लब क्रिकेटमध्ये कूक बेडफोर्डशायर संघाकडून खेळत होता. परंतु, पॉटन टाऊन सीसीच्या गोलंदाजासमोर त्याचा अनुभव व्यर्थ ठरला. यासामन्यात कूक 20 धावा करून बाद झाला. दरम्यान 12 षटकाच्या या सामन्यात पॉटन टाऊन सीसीच्या संघानं 26 धावांनी विजय मिळवला. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर कूक काऊंटी क्रिकेट खेळताना दिसत आहे.
व्हिडिओ-
ॲलिस्टर कूकची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
ॲलिस्टर कुकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चांगली आहे. त्यानं 161 सामन्यात 45.35 च्या सरासरीनं 12,472 धावा केल्या आहेत. त्यात 33 शतकांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जॅक कॉलिस आणि राहुल द्रविड यांच्यानंतर सर्वाधिक कसोटी धावा करणारा तो पाचवा फलंदाज आहे. कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघानं 1985 नंतर प्रथमच 2013 मध्ये भारतात कसोटी मालिका जिंकली होती.
हे देखील वाचा-