Salaries of All 10 Captains For IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. आयपीएलमधील दहा संघाचे कर्णधारही फिक्स झाले आहेत. पण त्या कर्णधाराला मिळणारा पगार तुम्हाला माहितेय का ? धोनी, हार्दिक, श्रेयस अय्यर सर्वात महागडा कर्णधार कोण असेल? याबाबत जाणून घेऊयात...

चेन्नई धोनीला प्रत्येक हंगामासाठी 12 कोटी रुपयांचं मानधन देते. तर हार्दिक पांड्यासाठी मुंबईने 15 कोटी रुपये मोजले आहेत. यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा कर्णधार पॅट कमिन्स आहे. हैदराबाद संघाने पॅट कमिन्सला 20 कोटींपेक्षा जास्त रुपये मोजत खरेदी केले.  भारताचा सर्वात महागडा कर्णधार कोण? दहा संघाच्या कर्णधाराचा पगार किती? याबाबत जाणून घेऊयात..

ऋषभ पंत दुखापतीनंतर सावरलाय, तो मैदानावर परतण्यासाठी सज्ज झालाय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ऋषभ पंत दिल्लीच्या संघाचं नेतृत्व करताना दिसेल. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर कोलकात्याचे नेतृत्व करताना दिसणार आहे.  आयपीएलमध्ये दहा संघाचे कोण कोणते कर्णधार असतील... त्यांचा वार्षिक पगार किती असेल, याची सर्वांनाच उत्सुकता असेल. 

आयपीएलमधील दहा संघाचे कर्णधार आणि त्यांचा पगार किती असेल. प्रत्येक संघाचा प्रशिक्षक आणि बॅकअप कर्णधार कोण कोण असेल ?

संघ  कर्णधार कर्णधाराचा पगार मुख्य प्रशिक्षक  बॅकअप कर्णधार
चेन्नई सुपर किंग्स   एमएस धोनी   12 कोटी स्टिफन फ्लेमिंग ऋतुराज गायकवाड
दिल्ली कॅपिटल्स   ऋषभ पंत   16 कोटी रिकी पाँटिंग डेविड वॉर्नर
कोलकाता नाईट रायडर्स   श्रेयस अय्यर 12.25 कोटी चंद्रकांत पंडित नितीश राणा
गुजरात टायटन्स शुभमन गिल  8 कोटी आशिष नेहरा राशीद खान
लखनौ सुपर जायंट्स केएल राहुल  17 कोटी जस्टीन लँगर निकोलस पूरन
मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या  15 कोटी मार्क बाऊचर सूर्यकुमार यादव
पंजाब किंग्स  शिखर धवन 8.25 कोटी Trevor Bayliss  सॅम करन
राजस्तान रॉयल्स संजू सॅमसन 14 कोटी कुमार संगाकारा जोस बटलर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर  फाफ डु प्लेसिस  7 कोटी अँडी फ्लॉवर विराट कोहली
सनरायजर्स हैदराबाद  पॅट कमिन्स  20.50 कोटी डॅनियल व्हिट्टोरी   एडन मार्करम

आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या 21 सामन्यांचं शेड्यूल 

  1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता
  2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
  3. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
  4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
  5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
  6. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
  7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
  8. सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
  9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वाजता
  10. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
  11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनऊ, संध्याकाळी 7.30 वाजता
  12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, दुपारी 3.30 वाजता
  13. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वाइजैग, संध्याकाळी 7.30 वाजता
  14. मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
  15. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
  16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, वायझॅग, संध्याकाळी 7.30 वाजता
  17. गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
  18. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
  19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30 वाजता
  20. मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
  21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता