RR vs SRH, IPL 2023 Live: राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
RR vs SRH Live Score: आयपीएल गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स संघ चौथ्या स्थानावर आहेत. राजस्थान संघाने आतापर्यंत दहा पैकी पाच सामने जिंकले आहेत.
हैदराबादचा चार विकेटने विजय
ग्लेन फिलिप्स बाद झालाय.. सात चेंडूत २५ धावांची खेळी केली.
चहलने एडन मार्करमला केले बाद.. चहलची चौथी विकेट.. हैदराबादचा अर्धा संघ तंबूत
युजवेंद्र चहल याचा भेदक मारा... राहुल त्रिपाठीला चहलने केले बाद... त्रिपाठी ४८ धावांवर बाद झालाय
युजवेंद्र चहलने क्लासनला बाद करत हैदराबादला तिसरा धक्का दिला.. क्लासेन याने १२ चेंडूत २६ धावांची खेळी केली
अर्धशतकानंतर अभिषेक शर्मा बाद झालाय.. अश्विनने घेतली विकेट
अभिषेक शर्माचे ३३ चेंडूत अर्धशतक
अनमोलप्रीत सिंहच्या रुपाने हैदराबादला पहिला धक्का बसला आहे. अनमोलप्रीतला ३३ धावांवर चहलने पाठवले तंबूत
जोस बटलरची झंझावाती फलंदाजी आणि संजू सॅमसनची कर्णधाराला साजेशी खेळीच्या बळावर राजस्थानने निर्धारित २० षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात २१४ धावांपर्यंत मजल मारली. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावरील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. जोस बटलर याने ९५ धावांची खेळी केली. तर संजू सॅमसन याने नाबाद ६६ धावांचे योगदान दिले. हैदराबादला विजयासाठी २१५ धावांचे आव्हान आहे.
जोस बटलरची आक्रमक खेळी संपुष्टात.... भुवनेश्वर कुमारने बटलरा ९५ धावांवर केले बाद
संजू सॅमसन याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. संजूने ३३ चेंडूत अर्धशतक झळकावले.
राजस्थानच्या फलंदाजांनी मयांक मार्केडेय याची धुलाई केली. मार्केडेंयच्या चार षटकात ५० पेक्षा जास्त धावा काढल्या. मयांकला एकही विकेट घेता आली नाही.
सलामी फलंदाज जोस बटलर याने वादळी फलंदाजी सुरु केली आहे. बटलर याने संयमी सुरुवात केली होती. त्यानंत आक्रमक रुप घेतले. बटलर ४४ चेंडूत ६९ धावांवर खेळत आहे.
जोस बटलरने ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले
कर्णधार संजू सॅमसन आणि जोस बटलर यांची दमदार फलंदाजी.. राजस्थान ११ षटकानंतर एक बाद ११५ धावा
यशस्वी जयस्वालच्या रुपाने राजस्थानला पहिला धक्का बसलाय... मार्को यान्सन याने घेतली विकेट... जयस्वाल ३५ धावा काढून बाद झालाय
जयस्वाल-बटलर मैदानावर उतरले आहेत..भुवनेश्वरच्या पहिल्याच षटकात दहा धावा
अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जानसन, विवरांत शर्मा, मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकिपर/कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2023 Points Table) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) शेवटच्या दहाव्या स्थानावर आहेत. हैदराबाद संघाने यंदाच्या मोसमातल नऊ पैकी तीन सामने जिंकले आहेत. हैदराबाद संघाला मागील पाच सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकण्यात यश आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मागील सामन्यात हैदराबादला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. राजस्थान संघाने आतापर्यंत दहा पैकी पाच सामने जिंकले आहेत. पण राजस्थान सलग दोन सामन्यांतील पराभवानंतर आज विजयासाठी मैदानात उतरणार आहे. मागील सामन्यात राजस्थानचा (Rajasthan Royals) गुजरात टायटन्सने दारुण पराभव केला.
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
जपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद एकूण 17 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने आठ सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्स संघाने नऊ सामने जिंकले आहेत. आयपीएल 2023 मध्ये या दोन संघांमध्ये सामना झाला असून यामध्ये राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज हैदराबाद संघाला मिळणार आहे.
जो रुटचे राजस्थानकडून पदार्पण होणार... यशस्वी जयस्वालने दिली कॅप
थोड्याच वेळात नाणेफेक होणार
पार्श्वभूमी
IPL 2023, Match 52, RR vs SRH: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) 52 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स (RR) सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन संघ एकमेकांविरोधात उतरणार आहे. सध्या आयपीएल गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स संघ चौथ्या स्थानावर आहेत. राजस्थान संघाने आतापर्यंत दहा पैकी पाच सामने जिंकले आहेत. पण राजस्थान सलग दोन सामन्यांतील पराभवानंतर आज विजयासाठी मैदानात उतरणार आहे. मागील सामन्यात राजस्थानचा (Rajasthan Royals) गुजरात टायटन्सने दारुण पराभव केला.
SRH vs RR IPL 2023 : हैदराबाद आणि राजस्थान आमने-सामने
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2023 Points Table) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) शेवटच्या दहाव्या स्थानावर आहेत. हैदराबाद संघाने यंदाच्या मोसमातल नऊ पैकी तीन सामने जिंकले आहेत. हैदराबाद संघाला मागील पाच सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकण्यात यश आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मागील सामन्यात हैदराबादला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.
RR vs SRH Head to Head : राजस्थान विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद एकूण 17 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने आठ सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्स संघाने नऊ सामने जिंकले आहेत. आयपीएल 2023 मध्ये या दोन संघांमध्ये सामना झाला असून यामध्ये राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज हैदराबाद संघाला मिळणार आहे.
Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
जपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.
IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) यांच्यात आज 7 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
SRH Playing 11 : हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11
अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, अकेल होसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक
RR Playing 11 : राजस्थानची संभाव्य प्लेईंग 11
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -