RR vs SRH IPL 2023 :  राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून जयपूरमध्ये दव पडलेला नाही. त्यामुळे धावांचा बचाव करणे सहज शक्य आहे, असे नाणेफेक जिंकल्यानंतर संजू सॅमसन याने सांगितले. हैदराबाद प्रथम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. 


हैदराबाद आणि राजस्थान संघात काही बदल करण्यात आले आहे. हैदराबादने हॅरी ब्रूक याला प्लेईंग ११ च्या बाहेर बसवले आहे. यंदाच्या हंगामात हॅरी ब्रूक याने शतकी खेळी केली. पण त्याव्यतिरिक्त ब्रूकला एकही मोठी खेळी करता आली नाही. हॅरी ब्रूकच्या जाही हैदराबादने ग्लेन फिलिप्सला संघात स्थान दिले. राजस्थानने जो रुट याला संघात स्थान दिलेय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग ११..,-...


राजस्थान रॉयल्स : 
यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकिपर/कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.


सनरायजर्स हैदराबाद :


अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जानसन, विवरांत शर्मा, मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.


 



RR vs SRH Head to Head : राजस्थान विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद एकूण 17 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने आठ सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्स संघाने नऊ सामने जिंकले आहेत. आयपीएल 2023 मध्ये या दोन संघांमध्ये सामना झाला असून यामध्ये राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज हैदराबाद संघाला मिळणार आहे. 


Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
जपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.


दोन्ही संघाची स्थिती काय?
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2023 Points Table) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) शेवटच्या दहाव्या स्थानावर आहेत. हैदराबाद संघाने यंदाच्या मोसमातल नऊ पैकी तीन सामने जिंकले आहेत. हैदराबाद संघाला मागील पाच सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकण्यात यश आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मागील सामन्यात हैदराबादला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.  राजस्थान संघाने आतापर्यंत दहा पैकी पाच सामने जिंकले आहेत. पण राजस्थान सलग दोन सामन्यांतील पराभवानंतर आज विजयासाठी मैदानात उतरणार आहे. मागील सामन्यात राजस्थानचा (Rajasthan Royals) गुजरात टायटन्सने दारुण पराभव केला.