RR vs RCB Live Updates, IPL 2022 Qualifier 2: प्रसिद्ध क्रृष्णा आणि अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीचा संघ निर्धारित 20 षटकात आठ बाद 157 धावांपर्यंत मजल मारु शकला. आरसीबीकडून पुन्हा एकदा रजत पाटीदारने दमदार खेळी केली. पाटीदारने अर्धशतकी खेळी करत आरसीबीचा डाव सावरला.. प्रसिद्ध कृष्णा आणि मकॉय यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 158 धावांची गरज आहे.


राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. पण प्रसिद्ध कृष्णाने पुन्हा एकदा विराट कोहलीचा अडथळा दूर केला. विराट कोहली सात धावा काढून बाद झाला... विराट कोहली बाद झाल्यानंतर रजत पाटीदार आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सावरला. फाफने संयमी फंलदाजी केली तर पाटीदारने विस्फोटक फलंदाजी केली. फाफ डु प्लेसिस 25 धावा काढून बाद झाला. फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी 53 चेंडूत 70 धावांची भागिदारी केली. फाफ बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पण बोल्टच्या गोलंदाजीवर मकॉयने ग्लेन मॅक्सवेलचा जबरदस्त झेल घेतला. मॅक्सवेल 13 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला.. त्याआधीर रजत पाटीदार याने एका बाजूने आरसीबीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पाटीदारने 42 चेंडूत 58 धावांची खेळी केली. महिपाल लोमरोरला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. तो 8 धावा काढून बाद झाला... फिनिशर कार्तिकला मोठी खेळी करता आली नाही... कार्तिक फक्त सहा धावा काढून बाद झाला.. त्यानंतर हसरंगा एकही धाव न काढता बाद झाला... प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या 19 व्या षटकात आरसीबीची दाणादाण उडाली होती. प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट घेत आरसीबीच्या धावांना आवर घातली. त्यानंतर अखेरच्या षटकात मकॉयनेही भेदक मारा केला.. पहिल्या चेंडूवर मकॉयने हर्षल पटेलला माघारी धाडले... पटेल फक्त एक धाव काढू शकला.. शाहबाद अहमदने अखेरच्या षटकात 8 चेंडूत 12 धावांची खेळी केली.. आरसीबीचा संघ 157 धावांपर्यंत मजल मारु शकला. आरसीबीला अखेरच्या पाच षटकात फक्त 34 धावा काढता आल्या.. 


KGF चा फ्लॉप शो -
आरसीबीची केजीएफ म्हणजे कोहली, ग्लेन आणि फाफ ही तिकडी पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली.. विराट कोहली 8 चेंडूत सात धावा, फाफ डु प्लेसिस 27 चेंडूत 25 धावा तर ग्लेन मॅक्सवेल 13 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला..


पर्पल कॅपची पाटी कोरीच -
पर्पल कॅप असणाऱ्या युजवेंद्र चहलला आरसीबीविरोधात एकही विकेट मिळाली नाही. सलग दोन सामन्यात चहलची विकेटची पाटी कोरी राहिली आहे. क्वालिफायर सामन्यातही गुजरातनेही चहलला विकेट दिली नव्हती. क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात आरसीबीच्या फंलदाजांनी चहलच्या गोलंदाजीवर सावध खेळी केली. चहललने चार षटकात तब्बल 45 धावा मोजल्या... विकेट मिळवण्यात चहल अपयशी ठरला. आरसीबीने चहलच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि एक चौकार वसूल केला. 


प्रसिद्ध कृष्णाचा भेदक मारा - 
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीपुढे आरसीबीची दाणादाण उडाली.. प्रसिद्ध कृष्णाने पावरप्लेमध्ये विराट कोहलीला बाद करत आरसीबीच्या अडचणी वाढवल्या.. तर हाणामारीच्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने कार्तिक आणि हसरंगाला बाद करत धावांना आवर घातली.  प्रसिद्ध कृष्णाने चार षटकात 22 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या... 


ओबेद मकॉयने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आरसीबीच्या फंलदाजांना अडचणीत टाकले..मकॉयने चार षटकात 23 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. मकॉयने आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, महिपाल लोमरोर आणि हर्षल पटेल यांना तंबूचा रस्ता दाखवला. बोल्ट आणि अश्विनला प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.