RR vs RCB Live Updates : राजस्थानचा आरसीबीवर सात गड्यांनी विजय

RR vs RCB Live Updates, IPL 2022 Qualifier 2: राजस्थान आणि बेंगळुरुची रॉयल लढत, कुणाला मिळणार फायनलचं तिकीट?

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 May 2022 11:03 PM
राजस्थानचा आरसीबीवर सात गड्यांनी विजय

जोस बटलरची शतकी (106) खेळी आणि प्रसिद्ध कृष्णा-अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गड्यांनी विजय मिळवलाय. या पराभवासह आरसीबीचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. 

जोस बटलरचं चौथं शतक

यंदाच्या हंगामात जोस बटलरच्या 800 धावा पूर्ण

पडिक्कल बाद

हेजलवूडने पडिक्कलला 9 धावांवर बाद केले

हसरंगाने केली चहलची बरोबरी

संजू सॅमसनला बाद करत हसरंगान चहलची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता 26 विकेट जमा झाल्या आहेत... 

राजस्थानला मोठा धक्का, संजू सॅमसन बाद

वानंदु हसरंगाने संजू सॅमसनला बाद करत आरसीबीला दुसरं यश मिळवून दिले. संजू सॅमसन 23 धावा काढून बाद झाला

राजस्थानची दमदार सुरुवात

158 धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानने दमदार सुरुवात केली आहे. राजस्थानने एक बाद 70 धावा केल्या आहेत. 

राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 158 धावांची गरज

प्रसिद्ध क्रृष्णा आणि अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीचा संघ निर्धारित 20 षटकात आठ बाद 157 धावांपर्यंत पोहचला. आरसीबीकडून पुन्हा एकदा रजत पाटीदारने दमदार खेळी केली. पाटीदारने अर्धशतकी खेळी करत आरसीबीचा डाव सावरला.. प्रसिद्ध कृष्णा आणि मकॉय यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 158 धावांची गरज आहे.

आरसीबीला आणखी एक धक्का..

मकॉयने हर्षल पटेलला बाद करत आरसीबीला आणखी एक धक्का दिला. 

हसरंगा बाद... आरसीबीची दाणादाण

हसरंगा एकही धाव न काढता बाद झाला... प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या 19 व्या षटकात आरसीबीची दाणादाण उडाली होती. 

आरसीबीला मोठा धक्का, दिनेश कार्तिक बाद

मोक्याच्या क्षणी प्रसिद्ध कृष्णाने फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकला बाद करत आरसीबीला सहावा धक्का दिला.. कार्तिक 6 धावा काढून बाद झाला.. 

आरीसीबचा अर्धा संघ तंबूत

लोमरोरच्या रुपाने आरसीबीला पाचवा धक्का बसलाय.

पाटीदारची खेळी संपुष्टात, अश्विनने पाठवले तंबूत

अर्धशतकानंतर पाटीदारची खेळी संपुष्टात आली आहे. पाटीदार 58 धावांवर बाद झालाय. अश्विनने पाटीदारचा अडथळा दूर केलाय. आरसीबी चार बाद 130 धावा

राजत पाटीदारची अर्धशतकी खेळी

एलिमेनटर सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रजत पाटीदारने पुन्हा एकदा फटकेबाजी केली आहे. पाटीदारने षटकार लगावत अर्धशतक झळकावलेय. 

आरसीबीला तिसरा धक्का, मॅक्सवेल बाद

मॅक्सवेलच्या रुपाने आरसीबीला तिसरा धक्का बसला आहे. बोल्टने मॅक्सवेलला बाद केले

आरसीबीच्या 100 धावा

पाटीदारच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने 100 धावांचा पल्ला पार केलाय

आरसीबीला दुसरा धक्का, डु प्लेसिस बाद

कर्णधार फाफ डु प्लेसिस 25 धावांवर बाद झालाय.... मकॉयने राजस्थानला दुसरे यश मिळवून दिलेय..आरसीबी दोन बाद 79 धावा

फाफ-पाटीदारने डाव सावरला

फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी आरसीबीचा डाव सावरलाय.. आरसीबी एक बाद 55 धावा

विराट कोहली बाद, आरसीबीला मोठा धक्का

प्रसिद्ध कृष्णाने विराट कोहलीला बाद करत आरसीबीला पहिला धक्का दिलाय.

सामन्याला सुरुवात

विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस आरसीबीकडून फंलदाजीसाठी मैदानात आले आहेत. तर चेंडू बोल्टच्या हातात

आरसीबीचा संघ

आरसीबी (Royal Challengers Bangalore) : 
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीगार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), वानंदु हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज 

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals ) :
जोस बटलर, यशस्वी जायस्वाल, संजू सॅमसन (विकेटकिपर, कर्णधार), देवदत्त पडिकल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, ओबाय मकाय, प्रसिद्ध कृष्णा 

राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे. या रॉयल लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे. 





सामन्याआधी दोन्ही संघातील खेळाडू

सामन्याआधी मैदानादीच पाहणी करताना

थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात

IPL 2022 : चहल आणि कार्तिकमध्ये रॉयल सामना, कोण पडणार भारी?

चहल आणि कार्तिक यांच्यातील मैदानावरील सामना रोमांचक राहिलाय. यामध्ये आतापर्यंत चहलचे पारडे जड असल्याचे दिसतेय. रिकॉर्ड्सवर नजर टाकल्यास चहलपुढे कार्तिक हातबल असल्याचे दिसतेय. चहलने दहा डावात तीन वेळा तंबूत धाडलये. चहलविरोधात कार्तिकची सरासरी 12.66 इतकीच राहिलेय. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये हा मुकाबला पाहण्यासारखा होणार आहे. कारण, कार्तिक आणि चहल तुफान फॉर्मात आहेत. 

सिराज मोठ्या विक्रमाच्या जवळ...

एक विकेट घेताच आरसीबीसाठी सिराज 50 विकेट घेण्याचा पराक्रम करणार आहे. 





कुणाचं पारडं जड?

आयपीएलच्या इतिहासाचा विचार करता आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानना 11 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत देखील सुटले आहेत. 

कसा आहे पिच रिपोर्ट?

आजचा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी मैदानात पार पडणार आहे. अहमदाबादचं वातावरण पाहता याठिकाणी उष्णता अधिक असू शकते. सायंकाळी 29 अंश सेल्सियस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता असूनही खेळपट्टी पाहता चेंडूला बाऊन्स मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गोलंदाजांना अधिक फायदा होऊ शकतो. त्यात सामनाही सायंकाळी आहे अशामध्ये दवाची अडचणही येऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकून संघ गोलंदाजी आधी घेण्याची अधिक शक्यता आहे. 

कधी आहे सामना? - 

आज 27 मे रोजी होणारा राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.

पार्श्वभूमी

RR vs RCB Live Updates, IPL 2022 Qualifier 2: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या हंगामात नव्याने सामिल झालेल्या गुजरातने अगदी दमदार कामगिरी करत सर्वात आधी अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. ज्यानंतर आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या संघातील सामन्यात विजेता होणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आयपीएलचा खिताॉब जिंकण्याचं स्वप्न इथेच संपणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त नक्कीच करतील. दोन्ही संघातील विजेता संघ थेट अंतिम सामना (IPL 2022 Final) खेळण्यासाठी जाणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. त्यामुळे आजच्या या करो या मरोची परिस्थिती असणाऱ्या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष्य लागून आह. 


आयपीएलच्या इतिहासाचा विचार करता आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानना 11 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत देखील सुटले आहेत. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता दोन्ही संघानी चांगली कामगिरी केली असल्याने आज एक चुरशीचा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळू शकतो.


कसा आहे पिच रिपोर्ट? - 
आजचा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी मैदानात पार पडणार आहे. अहमदाबादचं वातावरण पाहता याठिकाणी उष्णता अधिक असू शकते. सायंकाळी 29 अंश सेल्सियस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता असूनही खेळपट्टी पाहता चेंडूला बाऊन्स मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गोलंदाजांना अधिक फायदा होऊ शकतो. त्यात सामनाही सायंकाळी आहे अशामध्ये दवाची अडचणही येऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकून संघ गोलंदाजी आधी घेण्याची अधिक शक्यता आहे. 


कधी आहे सामना? - 
आज 27 मे रोजी होणारा राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.




 



कुठे आहे सामना? - 
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना? 
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.