RR vs RCB LIVE Score: राजस्थान-आरसीबीमध्ये 'करो या मरो'ची लढत, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
RR vs RCB IPL 2023 LIVE Score: प्लेऑफच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.
आऱसीबीच्या गोलंदाजीपुढे राजस्थानचा डाव ५९ धावांवर संपुष्टात आलाय.
अॅडम जम्पाच्या रुपाने राजस्थानला नववा धक्का
शिमरोन हेटमायरच्या रुपाने राजस्थानला आठवा धक्का बसलाय.. हेटमायर १९ चेंडूत ३५ धावा काढून बाद झालाय...
आर अश्विन याला सिराज याने धावबाद केले.. राजस्थानला सातवा धक्का बसलाय
कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर हेटमायरने लागोपाठ तीन षटकार लगवले.. राजस्थानची धावसंख्या सात बाद 50 धावा
ध्रुप जुरेलच्या रुपाने राजस्थानला सहावा धक्का बसलाय.. सात षटकात राजस्थानला सहावा धक्का बसलाय
पावरप्लेमध्ये राजस्थानचा अर्ध संघ तंबूत परतलाय.. जो रुट दहा धावांवर बाद झालाय.
पडिक्कल चार धावांवर बाद झालाय... मायकल ब्रेसवेल याने घेतली विकेट
दुसऱ्या षटकात राजस्थानने तिसरी विकेट गमावली... यशस्वी जयस्वाल, जोस बटलर यांच्यानंतर कर्णधार संजू सॅमसन बाद झालाय.. संजू सॅमसन चार धावांवर बाद
यशस्वी जयस्वालनंतर जोस बटलरही तंबूत परतलाय.. पार्नेल याने बटलरला बाद केले.. बटलरला खातेही उघडता आले नाही
फॉर्मात असलेला यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झालाय...
फाफ डु प्लेलिस आणि मॅक्सवेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आरसीबीने पाच विकेटच्या मोबदल्यात १७१ धावांपर्यंत मजल मारली. फाफ डु प्लेसिसने संयमी अर्धशतक झळकावले, तर मॅक्सवेल याने वादळी अर्धशतक झळकावले. अखेरच्या षटकात अनुज रावतने वादळी फलंदाजी करत आरसीबीचा डाव १७१ पर्यंत पोहचवला. राजस्थानला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिलेय. आज पराभूत होणाऱ्या संघाचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे.
मोक्याच्या क्षणी ग्लेन मॅक्सवेल बाद झालाय... संदीप शर्माने केले बाद...
३० चेंडूत अर्धशतक झळकावत मॅक्सवेल याने आरसीबीच्या डावाला आकार दिला..
महिपाल लोमरोरनंतर दिनेश कार्तिक तंबूत परतलाय.. कार्तिकला एकही धाव काढता आली नाही.
महिपाल लोमरोर स्वस्तात बाद
अर्धशतकानंतर फाफ डु प्लेसिस बाद झाला.. फाफने ५५ धावांची खेळी केली.
फाफ डु प्लेसिसने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झझळकावले.... ४१ चेंडूत ठोकले अर्धशतक
विराट कोहलीच्या रुपाने आरसीबीला पहिला धक्का.. कोहली १८ धावांवर बाद झालाय.
फाफ-विराटची दमदार फलंदाजी सुरु आहे. चार षटकात २९ धावांची भागिदारी
यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमेयर, रविचंद्रन अश्विन, एडम जम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युजवेंद्र चहल
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, वेन पार्नेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीच्या संघात काही बदल करण्यात आले आहेत. आरसीबीने हेजलवूड आणि हसरंगा यांना प्लेईंग ११ मधून बाहेर बसवलेय. तर राजस्थानच्या संघातही बोल्टला बाहेर बसवण्यात आले आहे. आरसीबीने मायकल ब्रेसवेल आणि वेन पार्नेल यांना प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय. तर राजस्थानने अॅडम झम्पाला स्थान दिलेय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग ११ कशी आहे.
नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
पार्श्वभूमी
RR vs RCB IPL 2023 LIVE Score: आज (14 मे) आयपीएलमध्ये (IPL 2023) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात यंदाच्या सीझनमधील 60 वा सामना रंगणार आहे. सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. या मोसमातील दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना असेल. याआधी झालेल्या सामन्यात राजस्थाननं 7 गडी राखून विजय मिळवला होता. तसेच, या सामन्यात दोन्ही संघ कोणत्या प्लेईंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आणि कोणता संघ विजयाला गवसणी घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मॅच प्रेडिक्शन
राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याच्या अंदाजाबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ आयपीएलमध्ये जवळपास बरोबरीत दिसत आहेत. एकूण 28 वेळा आमने-सामने आलेल्या सामन्यांमध्ये आरसीबीनं 14 आणि राजस्थान रॉयल्सनं 12 सामने जिंकले आहेत. त्यानुसार बंगळुरूचं पारडं काहीसं जड असल्याचं दिसून येत आहे.
याशिवाय सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या एकूण 7 सामन्यांपैकी राजस्थाननं 4 आणि आरसीबीनं 3 सामने जिंकले आहेत. ही आकडेवारी पाहता राजस्थान बंगळुरूपेक्षा काहीसा पुढे आहे. तसेच, या मोसमात दोन्ही संघांमध्ये खेळला गेलेला सामना राजस्थाननं जिंकला होता. अशा स्थितीत या सामन्यात घरच्या मैदानावर लक्ष ठेवल्यास राजस्थानच्या विजयाची शक्यता प्रबळ असल्याचं दिसत आहे.
राजस्थान विरुद्ध बंगळुरू हेड टू हेड
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये राजस्थाननं 12 आणि बंगळुरूनं 14 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचा आजचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे, जिथे दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा भिडले आहेत. या सामन्यांमध्ये राजस्थाननं 4 तर बंगळुरूनं 3 सामने जिंकले आहेत.
जपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.
डू प्लेसिस अन् यशस्वी जायस्वालमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस
पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याच्या प्रयत्नात असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ रविवारी राजस्थान रॉयल्सशी (RR) भिडणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांसोबतच दोन्ही संघातील दिग्गज खेळाडू यशस्वी जायस्वाल आणि फाफ डू प्लेसिस यांच्यातही रोमांचक लढत दिसणार आहे. दोघेही ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील आघाडीचे खेळाडू आहेत. सध्या ऑरेंज कॅप फाफच्या ताब्यात आहेत. तर ऑरेंज कॅप फाफकडून हिसकावण्यासाठी यशस्वीला केवळ एका धावेची गरज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोघांमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की.
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पॉईंटटेबलमधील स्थितीबाबत बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या संघानं त्यांच्या 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. तसेच, RCB 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. बंगळुरूच्या संघानं 11 सामन्यांत 5 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. दुसरीकडे, जर आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. पण घरच्या मैदानावर आरआरला पराभूत करणं आरसीबीसाठी सोपं नसणार आहे, एवढं मात्र नक्की
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
राजस्थान आणि बंगळुरूचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ :
यशस्वी जायसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकिपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा संभाव्य संघ :
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदु हसरंगा, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -