RR vs PBKS, IPL 2023 Live : अटीतटीच्या लढतीत पंजाबचा विजय

IPL 2023, Match 8, RR vs PBKS : राजस्थान राॅयल्स आणि पंजाब किंग्ज या संघात आज लढत होणार आहे.  हे दोन्ही संघ गुवाहाटीच्या स्टेडियमवर आमनेसामने येतील.

नामदेव कुंभार Last Updated: 05 Apr 2023 11:45 PM
अटीतटीच्या लढतीत पंजाबचा विजय

अटीतटीच्या लढतीत पंजाबने राजस्थानवर विजय मिळवला. 

मोक्याच्या क्षणी हेटमायर बाद

शिमरोन हेटमायर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला... तीन चेंडूत १२ धावांची गरज

चार चेंडूत १३ धावांची गरज

चार चेंडूत १३ धावांची गरज

जुरेल-हेटमायरची फटकेबाजी

जुरेल-हेटमायरची फटकेबाजी...सामना रंगतदार अवस्थेत...

RR vs PBKS, IPL 2023 Live : राजस्थानला आणखी एक धक्का, पडिक्कल बाद

RR vs PBKS, IPL 2023 Live : राजस्थानला आणखी एक धक्का, पडिक्कल बाद

राजस्थानचा अर्धा संघ तंबूत

राजस्थानचा अर्धा संघ तंबूत...रियान पराग २० धावा काढून बाद

सामना रोमांचक स्थितीत.... रियान पराग अन् पडिक्कल मैदानात

सामना रोमांचक स्थितीत.... रियान पराग अन् पडिक्कल मैदानात

राजस्थानला मोठा धक्का, संजू सॅमसन बाद

संजू सॅमसन बाद झाला आहे. हा राजस्थानला मोठा धक्का मानला जातोय. संजू सॅमसन ४२ धावा काढून बाद झालाय

आयपीएळचे संपूर्ण अपडेट एका क्लिकवर

राजस्थानला तिसरा धक्का, जोस बटलर बाद

राजस्थानला तिसरा धक्का, जोस बटलर बाद

राजस्थानला दुसरा धक्का, अश्विन बाद

अर्शदीपने राजस्थानला दोन धक्के दिले... यशस्वी जायस्वाल याच्यानंतर आर अश्विनही बाद

राजस्थानला पहिला धक्का, अर्शदीप बाद

राजस्थानला पहिला धक्का, अर्शदीप बाद

पंजाबची १९७ धावांपर्यंत मजल

पंजाबची १९७ धावांपर्यंत मजल

पंजाबला चौथा धक्का

शाहरुख खानच्या रुपाने पंजाबला चौथा धक्का बसला

शिखर धवनची फटकेबाजी

संथ सुरुवात करणाऱ्या शिखर धवन याने अखेरच्या काही षटकत रौद्र रुप धारण केले. ३० चेंडूत ३० धावा काढणाऱ्या धवन याने नंतर २०० च्या स्ट्राइक रेटने धावा वसूल केल्या. धवन सध्या ५५ चेंडूत ८५ धावांवर खेळत आहे.

पंजाबला तिसरा धक्का, सिकंदर रजा बाद

पंजाबला तिसरा धक्का, सिकंदर रजा बाद

पंजाबला दुसरा धक्का, जितेश शर्मा बाद

पंजाबला दुसरा धक्का, जितेश शर्मा बाद

शिखर धवनची कर्णधाराला साजेशी खेळी

शिखर धवन याने संयमी अर्धशतक झळकावले...

पंजाबला पहिला धक्का, प्रभसिमरन बाद

अर्धशतकी खेळीनंतर प्रभसिमरन बाद झाला. जोस बटलर याने भन्नाट झेल घेतला.

RR vs PBKS, IPL 2023 Live : पंजाबची दमदार सुरुवात, प्रभसिमरनचे अर्धशतक

RR vs PBKS, IPL 2023 Live : पंजाबची दमदार सुरुवात, प्रभसिमरन याने २९ चेंडूत अर्धशतक झळकावले

पंजाबची दमदार सलामी

शिखऱ आणि प्रभसिमरन यांची दमदार सलामी... दोघांनी आतापर्यंत ६४ धावा जोडल्या आहेत. प्रभासिमरन सर्वात घातक दिसत आहे. त्याने २२ चेंडूत ४४ धावा चोपल्या आहेत.

राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Rajsthan Playing XI : राजस्थान संभाव्य प्लेईंग 11

 


जोस बटलर (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल


Punjab Playing XI : पंजाब संभाव्य प्लेईंग 11

 


प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, सिकंदर रझा, सॅम कुरान, शाहरुख खान, नॅथन एलिस, हरप्रित ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंह

Barsapara Stadium Pitch Report : बरसापारा स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

 


बरसापारा स्टेडिअमची (Barsapara Stadium) खेळपट्टी (Pitch Report) मोठी धावसंख्या करणारी आहे. हे मैदान फलंदाजांसाठी फायदेशीर ठरतं. यावर सहज धावा होतात. फलंदाजाकडे ताकद आणि टायमिंग दोन्ही असेल आणि संयम असेल मोठे फटके मारता येतात. नाणेफेक हा देखील सामन्याचा महत्त्वाचा भाग असेल कारण अनेक संघांना प्रथम गोलंदाजी करायची आहे कारण, दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास मदत होते.




 


RR vs PBKS IPL 2023 Match 8 : कधी आणि कुठे होणार सामना?

 


राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals ) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात 5 एप्रिल रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर (Barsapara Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.

RR vs PBKS Head-To-Head : राजस्थान विरुद्ध पंजाब हेड-टू-हेड

पंजाब आणि राजस्थान दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थानचं पारड जड आहे. राजस्थानने 14 सामने जिंकले असून पंजाबला 10 सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. या दोन्ही संघांनी सर्वाधिक 200 हून अधिक धावसंख्येचा आकडा गाठला आहे.

पंजाब आणि राजस्थान विजयी घोडदौड कायम ठेवणार?

 


आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्स (PBKS) दोन्ही संघ विजयी पॅटर्न मिळवून विजयी पॅटर्न सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात असतील. राजस्थान त्यांचा नेट रनरेट कायम ठेवून गुणतालिकेत पहिला क्रमांक कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. तर पंजाब गुणतालिकेत वरच्या स्थानावर येण्यासाठी प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यातील विजयानंतर दोन्ही संघाचा हा दुसरा सामना असेल.






 




पार्श्वभूमी

RR vs PBKS Live Score : राजस्थान राॅयल्स आणि पंजाब किंग्ज या संघात आज लढत होणार आहे.  हे दोन्ही संघ गुवाहाटीच्या स्टेडियमवर एकमेकांच्या समोर उभं ठाकणार आहेत. हा सामना आज सांयकाळी 7:30 वाजतापासून रंगणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातील हा आठवा सामना आहे.  यापूर्वी या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक विजय मिळविला आहे. या दोन्ही संघातील आजचा आयपीएलमधील प्रत्येकी दुसरा सामना असणार आहे.  यापूर्वी हे दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यात विजयश्री मिळविली आहे. आज राजस्थान राॅयल्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यात रंगणाऱ्या सामन्यात कोणता संघ बाजीमारणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागली असणार.  


या दोन्ही संघात होणारा आजचा दुसरा सामना इंटरेस्टिंग होणार 


IPL 2023 मध्ये राजस्थान राॅयल्स  आणि किंग्ज इलेवन पंजाब या दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यात विजय संपादन करत धमाकेदार सुरूवात केली आहे. यंदाच्या हंगामात राजस्थान राॅयल्सने पहिल्याच सामन्यात सनराइजर्स हैदराबाद संघाला 72 धावांनी पराभव केला होता, तर पंजाबच्या संघाने रोमहर्षक सामन्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार कोलकाता नाईट रायडर्सचा 7 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे या दोन्ही संघातील लढत अत्यंत रजंक होणार असून क्रिकेट प्रेमींनाही याची उत्सुकता लागली आहे.  


आतापर्यंत दोन्ही संघातील लढती तुल्यबळ 


राजस्थान राॅयल्स  आणि पंजाब या संघामध्ये एकूण 24 लढती  झाल्या आहेत.  यामध्ये राजस्थानच्या संघाने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबच्या संघाने 9 लढती जिंकल्या आहेत. यादरम्यान दोन्ही संघात एक सामना अनिर्णित राहिला. तसेच या दोन्ही संघात खेळवण्यात आलेल्या गेल्या पाच सामन्यात राजस्थानच्या संघाने विजयाचा चौकार मारला आहे. याचाच अर्थ, पाचपैकी चार सामने जिंकून राजस्थाने आपले पारडे जड असल्याचे दाखवले आहे. या विजयी परंपरेत सातत्या राखण्यासाठी राजस्थानचा संघ आत्मविश्वाने मैदानात उतरणार आहे, तर दुसरीकडे पंजाब ही पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी उत्सुक आहे.


आजच्या सामन्यात कुणाचे पारडे जड आहे? 


आज राजस्थान राॅयल्स  आणि पंजाब या दोन संघात लढत होणार आहे. या दोन्ही संघादरम्यान होणाऱ्या लढतीत मागील आकडेवारी काढली तर राजस्थानचे पारडे जड आहेत. पण यंदाच्या आयपीएल हंगामात पंजाबच्या संघाने आपल्या ताफ्यात वेगवान गोलंदाजाचा भरती केले आहे. यामध्ये कासिगो रबाडा, अर्शदीप सिंग सारख्याशानदार आणि आक्रमक गोलदांचा समावेश आहे. दुसरीकडे राजस्थानचा संघ कर्णधार संजू सॅमसंग, जाॅस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यासारख्या आघाडीच्या मजबूत फलंदाचासोबत मैदाना उतरणार आहे.


दरम्यान, आजचा सामना गुवाहटीत खेळवला जाणार असून हा गुवाहाटीत खेळवला जाणारा आयपीएलचा पहिलाचा सामना असणार आहे. मागील आकडेवारीवरून तरी राजस्थानचे पारडे जड वाटत असले तरी प्रत्यक्ष मैदानावर सरस खेळ करणाऱ्या संघालाच वियश्री मिळणार, हे मात्र नक्की. त्यामुळे आज कोणता संघ जिंकणार हे ठामपणे कुणीही सांगू शकणार नाही. त्यामुळे आजच्या सामन्या कोण बाजी मारणार, हे आयपीएच्या चाहत्यांसाठी अौत्सुक्याचे ठरणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.