IPL 2024 : आयपीएल 2023 मध्ये जसप्रीत बुमराह नव्हता, हार्दिक पांड्याही नव्हता.. तरीही मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली होती. त्या हंगामात रोहित शर्मानं संधी दिलेल्या युवा खेळाडूंना यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्यानं डावलल्याचं दिसले. यावरुन चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. चाहत्यांनी पुन्हा एकदा हार्दिक पांड्यावर निशाणा साधलाय. अर्जुन तेंडुलकरसह पाच खेळाडूंना हार्दिक पांड्याने एकाही सामन्यात संधी दिली नाही. यावरुन चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
कोणता खेळाडू काय करु शकतो? त्याची क्षमता किती आहे? हे कर्णधाराला माहिती असतं. त्यामुळेच एमएस धोनी याला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हटलं जातं. त्याशिवाय रोहित शर्माही सर्वात यशस्वी कर्णधार आहे., त्याने पाच वेळा आयपीएल चषक जिंकलाय. रोहितच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये पदार्पण कऱणारे खेळाडू सध्या इतर संघामध्येही शानदार कामगिरी करत आहेत. यंदाच्या हंगामातही तिलक वर्मा याचं उदाहरण घ्या.. पण हार्दिक पांड्याने पाच खेळाडूंना संधीच दिली नाही. गेल्या हंगामात या खेळाडूंनी मुंबईसाठी शानदार कामगिरी केली होती. त्यांना यंदा बेंचवरच बसावं लागलं.
आता मुंबईचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात मुंबई युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. मागील दोन महिन्यांपासून हे खेळाडू एकही सामना खेळले नाहीत. ते फक्त बेंचवरच बसलेत. त्यामुळे अखेरच्या सामन्यात त्यांना संधी मिळू शकते. कोणत्या पाच खेळाडूंसोबत हार्दिक पांड्याने खेळ केला.
कुमार कार्तिकेय सिंह
या यादीत सर्वात आघाडीवर कुमार कार्तिकेय याचं नाव आहे. 2022 मध्ये मुंबईच्या संघात त्याची निवड झाली होती. कार्तिकेय डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. रणजी चषकात त्यानं मागील हंगामात 30 पेक्षा जास्त विकेट घेतल्या. 2024 आयपीएलमध्ये कार्तिकेयला संधी मिळेल, असा अंदाज होता. पण त्याला एकाही सामन्यात स्थान मिळालं नाही.
विष्णु विनोद
विष्णु विनोद सध्या दुखापतग्रस्त आहे. पण सुरुवातीच्या सामन्यात तो उपलब्ध होता. विकेटकीपर फलंदाज विष्णु विनोद विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण त्याला बेंचवरच बसावे लागले. ईशान किशन याला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आले नाही. पण तरीही विष्णु विनोदला संधी मिळाली नाही.
अर्जुन तेंडुलकर -
डावखुरा अर्जुन तेंडुलकर गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार खेळत आहे. त्यानं मागील आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी केली होती. त्याच्या नावावर तीन विकेट होत्या. पण यंदाच्या हंगामात अर्जुनला खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुन तळाला फलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्याशिवाय भेदक डावखुरा गोलंदाज आहे. पण त्याला यंदा एकदाही संधी मिळाली नाही.
शिवालिक शर्मा
शिवालिक शर्मा डावखुरा फलंदाज आहे. त्याशिवाय लेग ब्रेक गोलंदाजीही करतो. शिवालिक शर्माला मुंबईच्या ताफ्यात घेतल्यानंतर रोहित शर्मानेही त्याचं कौतुक केले होते. पण त्याला स्थान मिळालं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं अष्टपैलू खेळीचं शानदार प्रदर्शन केलेय. पण हार्दिक पांड्यानं त्याला संधी दिली नाही.
हार्विक देसाई
विष्णु विनोदची रिप्लेसमेंट म्हणून हार्विक देसाई याला संघात स्थान दिले. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. देसाई आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पृथ्वी शॉ याच्यासोबत तो अंडर 19 विश्वचषकात खेळला. त्यावेळी त्यानं शानदार कामगिरी केली होती. पण त्याला मुंबईकडून संधी दिली नाही.