RR vs PBKS, IPL 2023 Live :  राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुवाहाटीच्या मैदानात पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दोन्ही संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पंजाबचा संघ रबाडाला संधी देईल, असा अंदाज वर्तवल होता पण शिखर धवन याने विजयी संघ कायम उतरवला आहे. राजस्थान आणि पंजाब यांनी विजयी संघ मैदानात उतरला आहे. 






दोन्ही संघाची प्लेईंग ११ कशी आहे.. 


राजस्थान रॉयल्स – यशस्वी जायसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युजवेंद्र चहल.






पंजाब किंग्स – प्रभसिमरन कौर, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, जीतेश शर्मा (विकेटकीपर), सिकंदर रजा, सैम करन, शाहरुख खान, नाथन एलिस, हरप्रीत बरार, राहुल चाहर, अर्शदीप सिंह






Barsapara Stadium Pitch Report : बरसापारा स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


बरसापारा स्टेडिअमची (Barsapara Stadium) खेळपट्टी (Pitch Report) मोठी धावसंख्या करणारी आहे. हे मैदान फलंदाजांसाठी फायदेशीर ठरतं. यावर सहज धावा होतात. फलंदाजाकडे ताकद आणि टायमिंग दोन्ही असेल आणि संयम असेल मोठे फटके मारता येतात. नाणेफेक हा देखील सामन्याचा महत्त्वाचा भाग असेल कारण अनेक संघांना प्रथम गोलंदाजी करायची आहे कारण, दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास मदत होते.


RR vs PBKS Head-To-Head : राजस्थान विरुद्ध पंजाब हेड-टू-हेड
पंजाब आणि राजस्थान दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थानचं पारड जड आहे. राजस्थानने 14 सामने जिंकले असून पंजाबला 10 सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. या दोन्ही संघांनी सर्वाधिक 200 हून अधिक धावसंख्येचा आकडा गाठला आहे.


आजचा सामना गुवाहटीत खेळवला जाणार असून हा गुवाहाटीत खेळवला जाणारा आयपीएलचा पहिलाचा सामना असणार आहे. मागील आकडेवारीवरून तरी राजस्थानचे पारडे जड वाटत असले तरी प्रत्यक्ष मैदानावर सरस खेळ करणाऱ्या संघालाच वियश्री मिळणार, हे मात्र नक्की. त्यामुळे आज कोणता संघ जिंकणार हे ठामपणे कुणीही सांगू शकणार नाही. त्यामुळे आजच्या सामन्या कोण बाजी मारणार, हे आयपीएच्या चाहत्यांसाठी अौत्सुक्याचे ठरणार आहे.