Complete Details Of Salaries Of Umpire In IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. फलंदाज चौकार षटकार मारत आहेत तर गोलंदाज विकेट घेत आहे. आयपीएल सुरु होण्याआधी लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागते, या सर्व गोष्टींकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष असते. पण प्रत्येक सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्याला प्रत्येक सामन्याचे किती मानधन मिळते? याबाबत कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का ? काही पंचांना लाखो रुपयांचे मानधन दिले, हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल.
आयपीएलमध्ये पंचांना दोन गटात विभागले जाते. अनुभव आणि कौशल्य असणाऱ्या पंचांना एलिट गटामध्ये स्थान दिले जाते. इतर पंचांना सर्वसाधारन गटात ठेवण्यात येते. एलिट गटामध्ये येणाऱ्या पंचांना प्रत्येक सामन्याचे एक लाख 98 हजार रुपयांचे मानधन दिले जाते. त्याशिवाय प्रत्येक सामन्यात पंचांना 12,500 रुपयांच स्टायफंड दिले जाते.
आयपीएलच्या गेल्या हंगामात एलिट गटातील पंचांना प्रति सामन्यासाठी 1 लाख 75 हजार रुपये मानधन दिले जात होते. यंदा यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या हंगमापासून पंचांना प्रति सामना जवळपास दोन लाख रुपयांचे मानधन दिले जाते. नवीन आणि कमी अनुभवाच्या पंचांना कमी महत्वाच्या सामन्याची जबाबदारी दिली जाते. या पंचांना गेल्या हंगमात प्रति सामन्यासाठी चाळीस हजार रुपयांचे मानधन दिले जात होते. यंदा यामध्ये वीस हजार रुपयांची वाढ करण्यात आळी आहे. यंदापासून या पंचांना प्रत्येक सामन्याला साठ हजार रुपयांचे मानधन दिले जाते.
त्याशिवाय आयपीएलमध्ये पंचांची प्रवास, भोजन आणि राहण्याची सोय करण्यात येते. एलिट गटातील पंच साधारणपणे आयपीएलच्या एका हंगामातून 35 ते 40 लाख रुपयांची कमाई करत असेल. त्याशिवाय प्रत्येक हंगामात पंच जाहिरातीचे शर्ट घालून असतात.. त्यासाठी त्यांना वेगळे मानधन मिळते. गेल्या हंगमात जाहिरातदाराकडून साडेसत लाख रुपयांचे मानधन देण्यात आले होते.