RR vs MI, IPL 2022 Marathi News : मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने 35 व्या वाढदिवसाला नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार...मुंबई इंडियन्सचे अद्याप सहा सामने बाकी आहेत. या सहा सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. पण प्रतिस्पर्धी संघाला याचा फटका बसू शकतो. कारण मुंबईमुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. मुंबईकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे मुंबईच्या संघावर दबाव नसणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ इतर संघाची वाट लावू शकतात. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यात राजस्थानच्या संघाला पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे लागणार आहे.
मुंबईने राजस्थानविरोधात संघात दोन बदल केले आहेत. मुंबईने डेवॉल्ड ब्रेविस आणि जयदेव उनादकट यांना वगळले आहे. कुमार कार्तिकेय सिंह (Kumar Kartikeya Singh) आणि टीम डेविड यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलेय. राजस्थान रॉयल्सने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ राजस्थानने कायम ठेवलाय.
मुंबईची प्लेईंग 11 -
ईशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हर्तिक शौकीन, कायरन पोलार्ड, डॅनिअल सॅम्स, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रायली मेरिडेथ
राजस्थानची प्लेईंग 11 -
जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), डी. मिचेल, शिमरोन हेटायर, रियान पराग, रविचंद्रन अस्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चाहल, कुलदीप सेन
मुंबई- राजस्थानची यंदाच्या हंगामातील कामगिरी
यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघानं आठ सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यात मुंबईच्या संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. तर, दुसरीकडं राजस्थानच्या संघाला आठ पैकी सहा सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.
मुंबई- राजस्थान हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये मुंबई आणि राजस्थान 26 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 13 सामन्यात मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 12 सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईला धुळ चाखली आहे. यंदाच्या हंगामात मुंबई आणि राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानच्या संघानं बाजी मारली आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.