आवेश खानच्या अचूक माऱ्यासमोर दिल्ली झुकली; राजस्थानचा 12 धावांनी विजय

Rajasthan Royals Vs Delhi Capitals LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत झाली.

युवराज जाधव Last Updated: 28 Mar 2024 11:28 PM
राजस्थान रॉयल्सने जिंकला सामना; दिल्लीला 12 धावांनी नमवले

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सने 12 धावांनी विजय मिळवला आहे.





दिल्लीला विजयासाठी 6 चेंडूत 17 धावांची गरज

दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 6 चेंडूत 17 धावांची गरज आहे.

अश्विनच्या षटकांत 19 धावा; स्टब्सने दोन षटकार मारले

17 व्या षटकात एकूण 19 धावा आल्या. ट्रस्टन स्टब्सने आर. अश्विनवर दोन षटकार मारले. आता दिल्लीला विजयासाठी 18 चेंडूत 41 धावा करायच्या आहेत. स्टब्स 15 चेंडूत 28 धावांवर खेळत आहे. तर अक्षर पटेल चार धावांवर खेळत आहे.





दिल्लीला विजयासाठी 41 धावांची गरज

दिल्ली कॅपिटल्सला तीन षटकांत विजयासाठी 41 धावांची गरज आहे. संघाने 17 षटकांत 5 गडी गमावून 145 धावा केल्या आहेत. सध्या ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत.

दिल्लीला पाचवा धक्का, अभिषेक पोरेल बाद

अभिषेक पोरेलच्या रूपाने दिल्ली कॅपिटल्सला पाचवा धक्का बसला. 16व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर युझवेंद्र चहलने त्याला बाद केले. पोरेलला केवळ नऊ धावा करता आल्या. आता संघाला विजयासाठी 27 चेंडूत 64 धावांची गरज आहे.

युझवेंद्र चहलने घेतली ऋषभ पंतची विकेट

युजवेंद्र चहलने आपल्या दुसऱ्याच षटकांत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतची विकेट घेतली. या सामन्यातील त्याचे हे पहिले यश आहे. पंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने 26 चेंडूत 28 धावा केल्या. अभिषेक पोरेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. संघाला विजयासाठी 35 चेंडूत 72 धावांची गरज आहे.





वॉर्नरचे अर्धशतक हुकले; 49 धावा करत माघारी

डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. 12व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आवेश खानने त्याला झेलबाद केले. वॉर्नरने पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.





दिल्ली कॅपिटल्स संकटात; दोन गडी बाद, ऋषभ पंत मैदानात

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिकी भुईच्या रूपाने दिल्लीला दुसरा धक्का बसला. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बर्गरने त्याला आपला बळी बनवले. तत्पूर्वी, या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बर्गरने मार्शला बाद केले होते. आता ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.





तीन षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या 29/0

राजस्थानविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली आहे. तीन षटकांत संघाची धावसंख्या 29/0 आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श क्रीजवर आहेत. दोघांमध्ये जबरदस्त भागीदारी पाहायला मिळत आहे.

186 धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली सज्ज

राजस्थानने दिलेल्या 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज आहे. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर सलामीच्या फलंदाजीसाठी मैदानावर आले आहेत.

20 षटकांत 4,4,6,4,6,1; दिल्लीपुढं 186 धावांचं लक्ष्य

राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 186 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात रियान परागने आक्रमक फलंदाजी केली आहे. रियान परागने 45 चेंडूत 84 धावा केल्या. तर शेवटच्या षटकात या फलंदाजाने ॲनरिक नॉर्टजेला लक्ष्य केले आणि 6 चेंडूत 25 धावा झळकावल्या. 





राजस्थानची धावसंख्या 145/5

18 षटकांनंतर राजस्थान रॉयल्सची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 145 धावा आहे. रियान पराग 38 चेंडूत 58 धावांवर खेळत आहे. आतापर्यंत त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत.

राजस्थानची पाचवी विकेट; ध्रुव जुरेलला अपयश

राजस्थानचा पाचवा फलंदाज बाद झाला आहे. ध्रुव जुरेल 12 चेंडूत 20 धावा करत बाद झाला. ॲनरिक नॉर्टजेने त्याला त्रिफळाचीत केले.

रियान परागने अवघ्या 34 चेंडूत झळकावले अर्धशतक

रियान परागने अवघ्या 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. 16 षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 123 धावा आहे. पराग 50 आणि ध्रुव जुरेल 09 धावांवर खेळत आहेत.





राजस्थानला चौथा झटका; आर. अश्वीन बाद

आर. अश्वीन बाद झाला असून राजस्थानला चौथा धक्का बसला आहे.  अश्वीनने आक्रमक खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. अश्वीनने 19 चेंडूत 29 धावा केल्या. यामध्ये खणखणीत 3 षटकार देखील लगावले. सध्या राजस्थानची 14 षटकांत 93/4 अशी धावसंख्या आहे. 





जॉस बटलर बाद; कुलदीप यादवने घेतली विकेट

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर जॉस बटलर बाद झाला आहे. बटलर बाद झाल्यानंतर आर. अश्विन फलंदाजीसाठी आला आहे. सध्या राजस्थानची 9 षटकांत 46 अशी धावसंख्या आहे.





राजस्थानला मोठा धक्का; जैस्वालनंतर कर्णधार संजू सॅमसन बाद

राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसनला आज चांगली खेळी करता आलेली नाही. खलील अहमदच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन बाद झाला आहे. 6 षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या 31/2 अशी आहे.





राजस्थानच्या 5 षटकांत 29 धावा

राजस्थानच्या 5 षटकांत फक्त 29 धावा झाल्या आहेत. दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत राजस्थानला मागे ढकलले आहे.

संजू सॅमसनने लगावले सलग तीन चौकार

मुकेश कुमारने चौथे षटक टाकले. या षटकात संजू सॅमसनने सलग तीन चौकार मारले. 4 षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या एका विकेटवर 26 धावा आहे. सॅमसन 9 चेंडूत 14 धावांवर तर बटलर 8 चेंडूत 6 धावांवर खेळत आहे.





राजस्थानला पहिला धक्का; जैस्वाल माघारी

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जौस्वाल बाद झाला आहे. मुकेश कुमारने त्याला 5 धावांवर असताना त्रिफळाचित केले.

ॲनरिक नॉर्टजे दिल्लीच्या संघात दाखल

दिल्ली कॅपिटल्सची Playing XI

दिल्ली कॅपिटल्सची Playing XI- डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (w/c), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार


इम्पॅक्ट प्लेअर- अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशगरा, रसिक दार.

राजस्थान रॉयल्सची Playing XI

राजस्थान रॉयल्सची Playing XI- यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान


इम्पॅक्ट प्लेअर- रोविमन पोयल, नांद्रे बर्गेर, तनुष खतियान, शुभम दुबे, कुलदीप सेन

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचा 100 वा आयपीएल सामना

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली

राजस्थान रॉयल्स अन् दिल्ली कॅपिटल्सचा सराव जोरात

आज राजस्थानविरुद्ध दिल्लीचा सामना; पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल

राजस्थान रॉयल्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज

SRH : हेन्रिच क्लासेनच्या मुलीचा व्हिडिओ समोर , हैदराबादकडून शेअर

हेन्रिच क्लासेनच्या लेकीचा व्हिडिओ हैदराबादकडून शेअर





Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं त्याच्या वादळी खेळीचं गुपित सांगितलं?

अभिषेक शर्मानं त्याच्या वादळी खेळीचं गुपित सांगितलं





Rishabh Pant Against RR : रिषभ पंतचं राजस्थान विरुद्धचं रेकॉर्ड काय सांगतं?

रिषभ पंतनं कार अपघातानंतर आयपीएलमध्ये कमबॅक केलं आहे. रिषभ पंतची राजस्थान रॉयल्स विरुद्ध कामगिरी चांगली राहिली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रिषभ पंतनं 9 मॅचमध्ये चार अर्धशतकं केली आहेत. रिषभनं राजस्थान विरुद्ध 170 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या आहेत.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या पुढील चार मॅच होम ग्राऊंडवर

मुंबई इंडियन्सच्या पुढील चार मॅच होमग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. 





Rishabh Pant : रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स साठी 100 वी मॅच खेळणार

दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत यानं दुखापतीनंतर कमबॅक केलं आहे. आज रिषभ पंत दिल्लीकडून 100 वी मॅच खेळणार आहे. 





DC Team Update : दिल्ली आजही पृथ्वी शॉला बाहेर बसवणार का? 

दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनानं मिशेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ते रिकी भुईला ते मधल्या फळीत बॅटिंगला संधी देण्याची शक्यता असल्यानं पृथ्वी शॉ आजही संघाबाहेर राहण्याची शक्यात आहे.

राजस्थान आणि दिल्ली यांच्यात मॅच कधी सुरु होणार?

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील मॅच सायंकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. रिषभ पंतच्या टीमला कमबॅक करण्याची संधी आहे. 

RR Vs DC Head To Head : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये गेल्या पाच मॅचमध्ये काय घडलं?

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये गेल्या पाच मॅचमध्ये तीन मॅचेस राजस्थाननं जिंकल्या होत्या.

राजस्थान की दिल्ली  कोण जिंकणार? गुगलचं प्रेडिक्शन काय?

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये नेमकी कोणती टीम विजयी होईल यासंदर्भात गुगल प्रेडिक्शनच्या अंदाजानुसार राजस्थानच्या विजयाची शक्यता 56 टक्के आहे. तर, दिल्लीच्या विजयाची शक्यता 46 टक्के आहे. 

DC vs RR : दिल्ली विजयाचं खातं उघडणार?

दिल्ली कॅपिटल्सचा संघ आजच्या मॅचमध्ये विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानावर उतरेल. दिल्लीचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला होता. 

RR vs DC : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने येणार

आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने येणार आहेत. राजस्थान दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करेल.

पार्श्वभूमी

Rajasthan Royals Vs Delhi Capitals LIVE, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 9व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 12 धावांनी पराभव केला. राजस्थानसाठी प्रथम रियान परागने 84 धावांची नाबाद खेळी केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी आपले काम चोख बजावत शानदार विजय मिळवला. 





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.