RR vs CSK, IPL 2023 Live: राजस्थानचा चेन्नईवर विजय

RR vs CSK Live Score: धोनी आणि संजू सॅमसन आमने सामने, कोणता संघ मारणार बाजी?

नामदेव कुंभार Last Updated: 27 Apr 2023 11:10 PM
राजस्थानचा चेन्नईवर विजय

राजस्थानचा चेन्नईवर विजय

चेन्नईचा अर्धा संघ तंबूत मोईन अली बाद

चेन्नईचा अर्धा संघ तंबूत मोईन अली बाद

चेन्नईला लागोपाठ दुसर धक्का, रायडू शून्यावर बाद

अजिंक्य रहाणे बाद, अश्विनने पाठवले तंबूत

१५ धावांवर अजिंक्य रहाणे बाद, अश्विनने पाठवले तंबूत

चेन्नईला दुसरा धक्का, ऋतुराज बाद

चेन्नईला दुसरा धक्का, ऋतुराज  ४७ धावांवर बाद झाला. झम्पा याने केले बाद...

चेन्नईला पहिला धक्का, कॉनवे बाद

चेन्नईला पहिला धक्का, कॉनवे बाद झाला.. कॉनवेला १६ चेंडूत फक्त ८ धावा काढता आल्या.

कॉनवे-गायकवाडची संयमी फलंदाजी

कॉनवे-गायकवाडची संयमी फलंदाजी

राजस्थान रॉयल्सची २०२ धावांपर्यंत मजल

राजस्थान रॉयल्सची २०२ धावांपर्यंत मजल

राजस्थानला चौथा धक्का

राजस्थानला चौथा धक्का

राजस्थानला लागोपाठ दोन धक्के, यशस्वी जायस्वाल-संजू बाद

राजस्थानच्या १०० धावा पूर्ण

राजस्थानच्या १०० धावा पूर्ण... यशस्वी जायस्वालची आक्रमक फलंदाजी

राजस्थानला पहिला धक्का

राजस्थानला पहिला धक्का... जोस बटलर २७ धावांवर बाद

यशस्वी जायस्वालचे वादळी अर्धशतक

यशस्वी जायस्वालचे २६ चेंडूत वादळी अर्धशतक

राजस्थानची आक्रमक सुरुवात

राजस्थानची आक्रमक सुरुवात केली आहे. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी वादळी खेळी केली. सहा षटकात ६० धावांची सलामी दिली.

चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन- 

ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी ( कर्णधार आणि विकेटकीपर), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महिश तिक्ष्णा.

राजस्थान रॉयल्सचे अकरा शिलेदार कोणते ? 

यशस्वी जायसवाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन ( कर्णधार आणि विकेटकीपर), शिमरोन हेटमेयर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, एडम जम्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.

राजस्थानने नाणेफेक जिंकली

राजस्थानने नाणेफेक जिंकली असून चेन्नईला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेय

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

RR vs CSK, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

राजस्थान (RR) आणि चेन्नई (CSK) यांच्यात 19 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

जपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.

CSK vs RR IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि राजस्थान (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड जड दिसून आलं आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 सामने जिंकले असून राजस्थान संघाने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. आजच्या धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई आणि संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान संघ आमने-सामने येणार आहेत.

RR vs CSK, IPL 2023 Match 37 : चेन्नई विरुद्ध राजस्थान

जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सला मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर चेन्नई संघाने शेवटच्या सामन्यात कोलकाताववर विजय मिळवला होता. दोन्ही संघांमध्ये आज चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 37, RR vs CSK:  आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन संघांमध्ये (CSK vs RR Match Preview) लढत पाहायला मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील 37 वा सामना आज, 27 एप्रिलला राजस्थानच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. चेन्नई संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून संघ अव्वल स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर राजस्थान संघ गेल्या सामन्यांनतर पहिल्या स्थानवरून घसरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा पहिलं स्थान काबीज करण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल.

RR vs CSK, IPL 2023 Match 37 : चेन्नई विरुद्ध राजस्थान
जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सला मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर चेन्नई संघाने शेवटच्या सामन्यात कोलकाताववर विजय मिळवला होता. दोन्ही संघांमध्ये आज चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

CSK vs RR IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि राजस्थान (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड जड दिसून आलं आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 सामने जिंकले असून राजस्थान संघाने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. आजच्या धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई आणि संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान संघ आमने-सामने येणार आहेत.

Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
जपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.

RR vs CSK, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
राजस्थान (RR) आणि चेन्नई (CSK) यांच्यात 19 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.