नवी दिल्ली: टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्यानं पाकिस्तानातील क्रिकेट चाहते, भारतातील क्रिकेट प्रेम, दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट खेळतानाची आव्हानं आणि डेल स्टेनच्या बॉलिंग संदर्भात भाष्य केलं.  पाकिस्तानी चाहते क्रिकेटवर प्रेम करतात. जेव्हा आम्ही यूकेमध्ये मॅच ते येतात आणि आदरानं ते भारतीय क्रिकेटर्सवर किती प्रेम करतात ते सांगतात.  प्रामुख्यानं ते खेळावर प्रेम करतात. तुमचं कौतुक होतं तेव्हा तुम्हाला आनंद वाटतोच, असं रोहित शर्मा म्हणाला. 


वैयक्तिकरित्या मी क्रिकेटर आहे, मला आव्हानं स्वीकारायला आवडतं कोणत्याही स्थानावर क्रिकेट खेळत असलो तरी पाकिस्तानची टीम चांगली आहे, त्यांच्याकडे चांगले युवा वेगवान गोलंदाज आहेत. पाकिस्तानकडे चांगले फलंदाज आहेत. टीमचा विषय सोडून दिला तरी देशाबाहेरील  लोक आमच्यावर प्रेम करतात, असं रोहित शर्मानं म्हटलं. 


दक्षिण आफ्रिकेत खेळणं आव्हानात्मक


ऑस्ट्रेलियात गेल्यास तुम्हाला अनेक आव्हानं असतात. ऑस्ट्रेलियापेक्षा तुमच्यापुढं दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट खेळणं आव्हानात्मक असतात. केपटाऊन, जोहान्सबर्गमध्ये वेगवेगळं वातावरण असतं, जे ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये नसतं, असं रोहित शर्मानं म्हटलं. दक्षिण आफ्रिकेत वेग आहे बाऊन्स असतो, असं रोहित शर्मानं म्हटलं. डेल स्टेनच्या बॉलिंगचा सामना  करण्यापूर्वी 100 वेळा व्हिडीओ पाहिले आहेत. तो महान खेळाडू आहे, त्याची बॉलिंग पाहणं पर्वणी असते. डेल स्टेन वेगातील बॉलला स्विंग करु शकायचा. मला डेल स्टेन विरुद्ध यश आलं नाही मात्र मी माझ्या संघर्षाचा आनंद घेतला, असं रोहित शर्मानं म्हटलं. जॅक क्रॉली, स्टीव्ह स्मिथ यांची फलंदाजी पाहणं आवडतं, असं रोहित शर्मानं म्हटलं. 


यूरोपमध्ये फूटबॉलवर जसं प्रेम केलं जातं त्याच्या तुलनेत दहा पट क्रिकेटवर प्रेम भारतात केलं जातं. लोक तुम्हाला पाहत असतात, तुमच्यावर प्रेम करु शकतात. जेव्हा गोष्टी अवघड असतात, तुमच्या विरोधात जातात त्यावेळी लोक तुमच्या घरावर दगड देखील फेकतात. ते माझ्या घरावर टाकू शकत नाहीत कारण मी ऊंच इमारतीत राहतो, असं रोहित शर्मा म्हणाला. 


क्रिकेटमुळं मानसिकदृष्ट्या मजबूत बनलो, असं रोहित शर्मा म्हणाला. जेव्हा तुम्ही 70 ते 80 हजार लोकांसमोर खेळत असता त्यावेळी तुमच्या बाजूनं गोष्टी घडत असतील तर बरं असतं. मात्र, तुमच्या बाजूनं गोष्टी घडत नाहीत तेव्हा तुम्हाला टीकेला देखील  सामोरं जावं लागत असतं. भारतासारख्या देशात जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळत असता त्यावेळी ते तुम्हाला देवासारखं देखील मानतील, असं रोहित शर्मा म्हणाला.   


संबंधित बातम्या :


Rohit Sharma : सतरा वर्ष झाली अजून कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार, रोहित शर्मानं दिली मोठी अपडेट


IPL 2024, Tristan Stubbs : मुंबईचा तो निर्णय चुकला, दिल्ली कॅपिटल्सनं स्टब्सला संधी दिली, युवा खेळाडूनं 50 लाखांमध्ये आयपीएल गाजवलं