RR vs RCB : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs MI) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात मुंबईला यंदाच्या हंगामातील विजयाची प्रतिक्षा असणार आहे, कारण दोन्ही मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या दोन पैकी दोनही सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे केकेआर मात्र यंदा चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी तीन पैकी दोन सामने खिशात घातले आहेत. पण असं असतानाही आजच्या सामन्यापूर्वी या दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धता इतिहास पाहणंही महत्त्वाचं आहे.



केकेआर तीन पैकी दोन सामने जिंकत पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे मुंबईचा संघ मात्र आठव्या स्थानी आहे. आजचा सामना मुंबईच्या एमसीए मैदानात पार पडणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता संघ चांगली कामगिरी करेल यासाठी त्यांच्या आजवरच्या इतिहासावर (Head to Head) एक नजर फिरवू... 


मुंबई विरुद्ध कोलकाता Head to Head


आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचं पारडं अगदी जड आहे. कारण मुंबईने 29 पैकी 22 सामने एकहाती जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर केकेआरला केवळ 7 सामन्यात विजय मिळवता आला आहे. पण यंदा केकेआरचा फॉर्म मुंबईपेक्षा अधिक चांगला असल्याने आजचा  सामना चुरशीचा होणार हे नक्की.


आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11  


मुंबई - रोहित शर्मा (कर्णधार) ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी. 


कोलकाता - अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha