T20 World Cup: आगामी टी20 विश्वचषकाच्या संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याची वर्णी लागली. 15 सदस्यीय संघात हार्दिक पांड्याला संधी देण्यात आली आहे. पण खरे तर टी20 विश्वचषकाच्या संघात रोहित शर्मा आणि अजित आगरकरला हार्दिक पांड्या नकोच होता. पण बीसीसीआयच्या दडपणाखाली हार्दिक पांड्याला विश्वचषकाच्या संघात स्थान दिल्याचं समोर आले आहे. बीसीसीआयच्या दडपणानंतर विश्वचषकाच्या संघात हार्दिक पांड्याला स्थान देण्यात आले आहे. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या टी 20 संघात मुंबई इंडियन्सच्या चार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. 


रोहित-आगरकरला पांड्या नको होता? -


हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषकात संधी मिळाली, त्यातही त्याच्याकडे उपकर्णदारपद सोपवल्यामुळे विविध चर्चेला उधाण आले होते. अनेक दिग्गजांनी याबाबत आक्षेप नोंदवला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकासाठी अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीत रोहित शर्मा आणि अजित आगरकर हार्दिक पांड्याच्या निवडीविरोधात होते. आगरकर आणि रोहित यांच्या तिव्र विरोधानंतरही बीसीसीआयनं दडपण आणत हार्दिक पांड्याला टीम इंडियात स्थान दिले. इतकेच नाही तर त्याच्याकडे उपकर्णधारपदही सोपण्यात आले. 


हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईची खराब कामगिरी -


आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय खराब झाली. मुंबई इंडियन्स सध्या तळाला आहे. त्यांचं प्लेऑफचं आव्हानही संपुष्टात आले आहे. स्पर्धा सुरु होण्याआधी मुंबईने रोहित शर्माची हाकलपट्टी करुन हार्दिक पांड्याकडे धुरा सोपवली होती. पण हार्दिक पांड्याला कमाल करता आली नाही. त्यातच रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोल केले.


पांड्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह


टी20 विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याला संधी दिल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 30 एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित आणि आगरकर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना आगरकर म्हणाला की, सध्याच्या टीम इंडियाच्या पूलमध्ये हार्दिकला पर्याय उपलब्ध नसल्याने निवड समितीकडे कोणताही पर्याय नव्हता. जो तळाला स्फोटक फलंदाजी करेल, तसेच चार षटकांची मध्यमगती गोलंदाजी करतो.


हार्दिक पांड्या-रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये


हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा आयपीएलमध्ये खराब फॉर्मात आहेत. दोघांनाही धावा काढताना संघर्ष करावा लागतोय. 37 वर्षीय रोहित शर्माने आयपीएलच्या 13 डावात एका शतकाच्या मदतीने 349 धावा केल्या आहेत. दुसरीकडे हार्दिक पांड्याला 13 सामन्यात 200 धावाच कता आल्या आहेत. त्यानं 10 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. 


2 जूनपासून विश्वचषकाला सुरुवात


दोन जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये यंदाचा विश्वचषक रंगणार आहे. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी होणार आहे. तर 9 जून रोजी पाकिस्तानविरोधात आमनासामना होणार आहे.