Flopped Players Of IPL 2024 : अवघ्या आठवड्याभरात आयपीएल 2024 चा अंतिम सामना होणार आहे. दोन दिवसांमध्ये प्लेऑफचे संघही ठरतील. यंदाच्या हंगामात अनेक दिग्गजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. यामध्ये रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, ईशान किशन, ग्लेन मॅक्सवेल, अजिंक्य राहणे, अल्जारी जोसेफ यासारख्या दिग्गजांची नावांचा समावेश आहे.  कोट्यवधी रुपये खर्च करुन घेतलेल्या खेळाडूंना यंदाच्या हंगामात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणारे दिग्गज यंदा मात्र फ्लॉप झालेत.  कोणत्या भारतीय खेलाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.. त्याबाबत जाणून घेऊयात.


कोणत्या भारतीयांना केले निराश - 


मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या दोघांनाही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्माने एक शतक ठोकलेय, पण लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्माने 13 सामन्यात 349 धावा केल्या होत्या. तर हार्दिक पांड्यालाही गोलंदाजी आणि फलंदाजीत सातत्य राखता आले नाही. त्याची कामगिरीही निराशाजनकच राहिली आहे. ईशान किशनही फ्लॉप गेला. तीन दिग्गज फ्लॉप गेल्याचा फटका मुंबईला बसलाय. मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थानही मिळता आले नाही. ते गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहेत. फक्त आठ गुण आहेत. 


या खेळाडूंनी लावला कोट्यवधींचा चुना


ईशान किशन याला 13 सामन्यात फक्त 306 धावा करता आल्या. त्याला फक्त एकच अर्धशतक ठोकता आले. त्याशिवाय चेन्नईचा अनुभवी फलंदाज अजिक्य रहाणे यालाही लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला 12 सामन्यात 209 धावाच करता आल्या. यंदाच्या हंगामात सर्वात फ्लॉप राहिलेला खेळाडू आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल आहे. ग्लेन मॅक्सवेल याला आठ सामन्यात 104 धावाच करता आल्या. हैदराबादने शानदार कामगिरी केली, पण एडन मार्करम फ्लॉप ठरलाय. मार्करम याला 9 सामन्यात 199 धावाच करता आल्या.  अल्जारी जोसेफ, डेविड वॉर्नर, रायली रुसो, पॉवेल, यासारख्याविदेशी खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही.


आणखी वाचा :


VIDEO : क्रिकेटचं मैदान झालं कुस्तीचा आखाडा, ईशान किशन आणि टीम डेविड भिडले, कोण जिंकलं?