Rishabh Pant LSG Captaincy Inside Story नवी दिल्ली: रिषभ पंत आणि लखनौ सुपर जायंटस यांच्यातील संबंध बिघडत चालल्याचं पाहायला मिळतंय. रिषभ पंतनं आयपीएलच्या 19 व्या हंगामात लखनौ सुपर जायंटसच्या खराब कामगिरीमुळं कर्णधारपदावरुन हटवण्याची विनंती केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता नव्यानं आलेल्या रिपोर्टनुसार रिषभ पंतनं कर्णधार पद सोडलं नव्हतं तर त्याला त्या पदावरुन हटवण्यात आलं होतं.  लखनौ सुपर जायंटस आयपीएलच्या 19 व्या हंगामात गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहिले. तर, 2025 च्या हंगामात देखील रिषभ पंतच्या नेतृत्त्वात लखनौ सुपर जायंटस प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नव्हती.

Continues below advertisement

लखनौनं रिषभ पंतला कर्णधार पदावरुन काढलं

Cricblogger नुसार रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं नव्हतं, त्याला फ्रँचायजीनं काढून टाकलं. रिषभ पंत सातत्यानं खराब फॉर्ममध्ये असल्यानं संघ व्यवस्थापनानं हा निर्णय घेतला. टीमच्या खराब कामगिरीसाठी रिषभ पंतच्या कामगिरीचं समीक्षण करण्यात आलं. रिषभ पंतनं 2025 च्या हंगामात मेगा ऑक्शनमध्ये 27 हजार कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.  

दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणार

रिषभ पंत कर्णधारपदावरुन बाजुला झाल्यानंतर तो पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतो.  काही रिपोर्टनुसार रिषभ पंत ट्रेड डीलद्वारे कुलदीप यादव देखील लखनौकडे जाऊ शकतो. रिषभ पंतच्या पगारात देखील कपात होऊ शकते.

Continues below advertisement

रिषभ पंतचं करिअर

रिषभ पंतनं आयपीएल करिअरमध्ये 139 सामने खेळले आहेत. या पैकी 136  डावात फलंदाजी करताना 33.60 च्या सरासरीनं  146.79 स्ट्राइक रेटनं 3865 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, रिषभ पंतनं कर्णधार पद सोडल्यानं पुढील हंगामात लखनौ सुपर जायंटसला नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागेल. तर, दुसरीकडे मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाल्यानं हार्दिक पांड्या देखील मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद सोडू शकतो आणि तो लखनौकडे जाऊ शकतो अशा चर्चा आहेत. तर, मुंबईचा कर्णधार म्हणून तिलक वर्माचं नाव चर्चेत आहे.