RCB vs PBKS IPL Final 2025: आयपीएल 2025 च्या (IPL 2025) अंतिम फेरीसाठी दोन संघ निश्चित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर आता पंजाब किंग्जने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS IPL 2025 Final) यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येईल. आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाईल.

पंजाब किंग्सने (Punjab Kings) 11 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंजाब किंग्सने 2014 रोजी आयपीएलमधील अंतिम सामना खेळला होता. पंजाब किंग्स आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ चौथ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे. बंगळुरूने 9 वर्षांपूर्वी 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटचा आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता.

पंजाब किंग्सची संभाव्य Playing XI:

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, अजमातुल्ला ओमरझाई, विजयीश कुमार, अरविजकुमार, विजयकुमार सिंग

इम्पॅक्ट प्लेअर- युझवेंद्र चहल/हरप्रीत ब्रार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य Playing XI:

फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, जोश कुमार, हेजलवुड, सुयश शर्मा

इम्पॅक्ट प्लेअर- लियाम लिव्हिंगस्टोन/टिम डेव्हिड

अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल?

नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करणार आहे. क्वालिफायर-2 मध्येही या मैदानावर खूप धावा झाल्या. मुंबई इंडियन्सने 203 धावा केल्या ज्या पंजाब किंग्स सहजरित्या केल्या. आयपीएल 2025 च्या हंगामात या मैदानावर एकूण आठ सामने खेळले गेले आहेत ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 6 सामने जिंकले आहेत.

संबंधित बातमी:

IPL 2025 Final Prize Money: आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघावर पैशांचा पाऊस; मुंबई-गुजरातनेही कोट्यवधी कमावले, पाहा A टू Z माहिती

RCB vs PBKS IPL 2025 Final: पंजाबविरुद्ध बंगळुरुच्या अंतिम सामन्यातही पाऊस कोसळणार; पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॉफी मिळणार?; BCCI चा नियम जाहीर