RCB Vs MI: IPL 2022: मुंबईनं सलग चौथा सामना गमावला

RCB Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरू आणि मुंबई (Royal Challengers bangalore Vs Mumbai Indians) यांच्यात लढत होणार आहे.

Advertisement

abp majha web team Last Updated: 09 Apr 2022 11:31 PM

पार्श्वभूमी

RCB Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरू आणि मुंबई (Royal Challengers bangalore Vs Mumbai Indians) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर (Maharashtra...More

मुंबईनं सलग चौथा सामना गमावला

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरुच्या संघानं सात विकेट्स राखून मुंबईला पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघानं सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोदावर बंगळुरूसमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं 9 चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरूच्या विजयात अनुज रावतनं महत्वाची भूमिका बजावली.


 

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.