RCB Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरू आणि मुंबई (Royal Challengers bangalore Vs Mumbai Indians) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर (Maharashtra Cricket Association Stadium) खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाला सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरूनं तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे. तर, आपल्या खात्यात आणखी दोन गुण जमा करण्यासाठी बंगळुरूचा संघ संज्ज झालाय. 


आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचं पारडं जड आहे. कारण मुंबईने 29 पैकी 17 सामने एकहाती जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर आरसीबीला 12 सामन्यात विजय मिळवता आला आहे. पण यंदा बंगळुरुचा फॉर्म मुंबईपेक्षा अधिक चांगला असल्याने आजचा  सामना चुरशीचा होणार हे नक्की.


बंगळुरूचा संघ-
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, विराट कोहली, शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, ग्लेन मॅक्सवेल, सिद्धार्थ कौल, छमा व्ही मिलिंद, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, जेसन बेहरेनडॉर्फ, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, अनेश्वर गौतम.


मुंबईचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थंपी, जयदेव उनाडकट, फॅबियन अॅलन, अनमोलप्रीत सिंग, संजय यादव, रिले मेरेडिथ, रमणदीप सिंग, मयंक मार्कंडे, टिम डेव्हिड, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, अर्शद खान.


हे देखील वाचा-