RCB Vs KKR LIVE: आरसीबीनं सामना जिंकला, कोलकात्याचा 3 विकेट्सनं पराभव
IPL 2022 Live: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात आरसीबीचा संघ आज कोलकात्याशी भिडणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेतील आपापला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
abp majha web team Last Updated: 30 Mar 2022 11:21 PM
पार्श्वभूमी
IPL 2022 Live: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात आरसीबीचा संघ आज कोलकात्याशी भिडणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेतील आपापला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर फाफ डू...More
IPL 2022 Live: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात आरसीबीचा संघ आज कोलकात्याशी भिडणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेतील आपापला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघ कोलकाताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. तर, कोलकाताचा कर्णधार श्रेयस ब्रिगेडची नजर विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी असेल. पंजाब किंग्जविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आरसीबीनं पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, पंजाबनं 206 धावांचं आव्हान एक षटक राखून पूर्ण केलं. दुसरीकडं श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरनं पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नईचा पराभव करून विजयी सुरुवात केली. या सामन्यात कोलकातानं 6 विकेट्स राखून सहज विजय मिळवला. आता श्रेयस ब्रिगेड आता विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.कोलकात्याचा संघआंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी), पॅट कमिन्स (7.25 कोटी), श्रेयस अय्यर (12.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅकसन (60 लाख), अजिंक्य रहाणे (1 कोटी), रिंकू सिंह (55 लाख), अनुकूल रॉय (20 लाख), रसिक डार (20 लाख), बाबा इंद्रजीत (20 लाख), चमिका करुणारत्ने (50 लाख), प्रथम सिंह (20 लाख), अभिजीत तोमर (40 लाख). आरसीबीचा संघविराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी), फाफ ड्यू प्लेसी (7 कोटी), हर्षल पटेल (10.75 कोटी), वानिंदू हसारंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी), जोश हेझलवूड (7.75 कोटी), शाहबाज अहमद (2.4 कोटी), अनुज रावत (3.4 कोटी), आकाशदीप (20 लाख), फिन अलन (80 लाख), शेरफन रुदरफर्ड (1 कोटी), जेसन बेहरनडॉर्फ (75 लाख), सुयश प्रभुदेसाई (30 लाख), अनीश्वर गौतम (20 लाख).हे देखील वाचा- RCB vs KKR : केकआर आणि आरसीबी सामन्यासाठी सज्ज, 'या' 5 खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजरRCB vs KKR : केकआर आणि आरसीबी सामन्यासाठी सज्ज, 'या' 5 खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजरRCB vs KKR : कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामन्यात कशी असेल रणनीती, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आरसीबीनं सामना जिंकला, कोलकात्याचा 3 विकेट्सनं पराभव
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात बंगळुरूनं कोलकात्याला 2 विकेट्सनं पराभूत केलंय.