Bangalore vs Kolkata: आयपीएल 2021  (IPL 2021) मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि  कोलकाता नाईट रायडर्स या दोन टिममध्ये सामना होणार आहे. आरसीबीचा मीडियम पेसर हर्षल पटेलसाठी (Harshal Patel) आयपीएलचा हा सिझन अत्यंत महत्वाचा आहे. हर्षलने आत्तापर्यंत या सिझनमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत.  तसेच तो लवकरच खूप मोठा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. हर्षलने जर आजच्या मॅचमध्ये तीन विकेट आणखी घेतल्या तर तो आयपीएलच्या एका सिझनमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरेल. 


ड्वेन ब्राव्होने केला होता रेकॉर्ड
आयपीएलमध्ये सध्या हा रेकॉर्ड चेन्नई सुपर किंग्जच्या ऑलराउंडर  ड्वेन ब्राव्होने केला आहे. ब्राव्होने 2013 च्या आयपीएल सिझनमध्ये 32 विकेट घेऊन हा रेकॉर्ड बनवला होता. आजच्या मॅचमध्ये हर्षलकडे हा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करण्याची सुवर्ण संधी आहे. आधी हरियाणासाठी क्रिकेट खेळणारा हर्षल पटेल या सिझनमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू असून तो पर्पल कॅप होल्डर देखील आहे. आता हर्षल  ब्राव्होचे रेकॉर्ड ब्रेक करणार का हे पाहण्यासाठी सर्व क्रिकेट प्रेमी उस्तुक आहेत.  


DC vs CSK: चेन्नईकडून पराभवानंतर ऋषभ पंत म्हणाला, मी निशब्द झालोय,पण...



हर्षलने यावर्षी केले आहेत हे रेकॉर्ड 
हर्षलसाठी हा सिझन अत्यंत चांगला ठरला. आयपीएलच्या या सिझनमधला सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर हर्षद ठरला. या आधी हा रेकॉर्ड  मुंबई इंडियन्सचा स्टार फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहच्या नावावर होता. बुमराहने यूएईमध्ये झालेल्या आयपीएल मॅचच्या सिझनमध्ये 27 विकेट घेऊन हा रेकॉर्ड केला होता. तसेच एका अनकॅप्ड प्लेयरद्वारे एका सिझनमध्ये सर्वाधिक विकेटचा रेकॉर्ड देखील हर्षल पटेलने केला आहे. तसेच त्याने या टूर्नामेंमध्ये एक हॅट्रिक आणि एका वेळी पाच विकेट घेतल्या आहेत. 


IPLचा मराठमोळा हिरो, ऋतुराज गायकवाडची कमाल, ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार?


ICCकडून T20 World Cup पुरस्काराच्या रकमेची घोषणा, विजेत्यांना मिळणार कोट्यवधींची रक्कम