RCB vs GT, IPL 2023 Live: आरसीबी आणि गुजरातमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

RCB vs GT Live Score: गुजरात संघाने आधील प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर आरसीबी शेवटच्या जागेसाठी प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 22 May 2023 12:07 AM
गुजरातचा विजय

गुजरातचा विजय

गुजरातला चौथा धक्का

गुजरातला चौथा धक्का.. मिलर सहा धावांवर बाद

गुजरातला लागोपाठ दोन धक्के

गुजरातला लागोपाठ दोन धक्के.... विजय शंकरनंतर दासुन शनाका बाद झालाय... शुभमन गिलची एकाकी झुंज सुरुच

विजय शंकरचे तांडव

शुभमन गिल याच्यानंतर विजय शंकर यानेही अर्धशतक झळकावले. विजय शंकर याने 34 चेंडूत अर्धशतक झळकावले.

गिलचे वादळ...

बेंगलोरच्या मैदानावर शुभमन गिल याने वादळी फलंदाजी केली. गिल सध्या 28 चेंडूत 69 धावांवर खेळत आहे.

शुभमन गिलचे अर्धशतक

शुभमन गिलची अर्धशतकी खेळी.... 29 चेंडूत ठोकले अर्धशतक

विजय शंकर-शुभमन गिल यांची जोडी जमली

विजय शंकर-शुभमन गिल यांची जोडी जमली आहे. साहा लवरक बाद झाल्यानंतर या दोघांनी गुजरातच्या डावाला आकार दिला.

शुभमन गिलची दमदार फलंदाजी

शुभमन गिलची दमदार फलंदाजी सुरु आहे. गिल याने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतलाय.

गुजरातला पहिला धक्का

गुजरातला पहिला धक्का.. साहा बाद झालाय... 12 धावांवर साबा बाद झालाय... वेन पार्नेलने घेतला जबराट झेल

आरसीबीची 197 धावांपर्यंत मजल

आरसीबीची 197 धावांपर्यंत मजल...  गुजरातला विजयासाठी 198 धावांची गरज

यंदाच्या हंगामातील नववे तर विराट कोहलीचे दुसरे शतक -

मोक्याच्या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली. गुजरातविरोधात विराट कोहलीने शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीचे यंदाच्या हंगामातील दुसरे शतक झळकावले. तर आयपीएलच्या करिअरमधील विराट कोहलीचे सातवे शतक होय. यंदाच्या हंगामात आतापर्यंत आठ नऊ शतके झळकावण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून दोन शतके आली आहेत. तर आजच मुंबईच्या अखेरच्या साखळी सामन्यात कॅमरुन ग्रीन याने वादळी शतकी खेळी केली. ग्रीन याने यंदाच्या हंगामातील आपले पहिले शतक झळकावले.  यंदाच्या हंगामात इतर फलंदाजांनीही शतके झळकावली आहेत. यामध्ये तीन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे, दोन्ही खेळाडू हैदराबादचे आहेत. हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन आणि कॅमरुन ग्रीन यांनी शतके झळकावली आहेत. वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली... या भारतीय खेळाडूंनी यंदा शतके झळकावली आहेत. एका हंगामात नऊ शतके होण्याची पहिलीच वेळ आहे. 

विराट कोहलीची शतकी खेळी

विराट कोहली याने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात शथकाला गवसणी घातली आहे. हैदराबादविरोधात विराट कोहलीने शतक झळकावले होते. आज मोक्याच्या क्षणी विराट कोहलीने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आहे. विराट कोहलीने 60 चेंडूत शतक झळकावले. 

यंदाच्या हंगामात विराटच्या 600 धावा पूर्ण

आरसीबीचा अर्धा संघ तंबूत

आरसीबीचा अर्धा संघ तंबूत परतलाय... दिनेश कार्तिक खातेही न उघडता तंबूत परतला. यश दयाल याने घेतली विकेट

RCB ला चौथा धक्का

RCB ला चौथा धक्का बसलाय... ब्रेसवेल बाद झाला..शमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.. ब्रेसवेल याने 16 चेंडूत 26 धावांची खेळी केली.

आरसीबीच्या शंभर धावा

आरसीबीच्या शंभर धावा

विराट कोहलीची दमदार अर्धशतक

विराट कोहलीने 30 चेंडूत अर्धशतक झळकावले..

आरसीबीची फलंदाजी ढेपाळली

आरसीबीची फलंदाजी ढेपाळली.... आरसीबीला तिसरा धक्का बसलाय... महिपाल लोमरोर स्वस्तात बाद

आरसीबीला दुसरा धक्का

आरसीबीला दुसरा धक्का बसलाय.. ग्लेन मॅक्सवेल 11 धावांवर बाद झालाय.. राशिद खान याने घेतली विकेट

आरसीबीला पहिला धक्का....

आरसीबीला पहिला धक्का.... कर्णधार फाफ डु प्लेसिस बाद झालाय

विराट-फाफची आक्रमक सुरुवात

विराट-फाफची आक्रमक सुरुवात

आरसीबी-गुजरात सामन्यात पावसाचा व्यत्यय

आरसीबी-गुजरात सामन्यात पावसाचा व्यत्यय

RCB च्या संघात एक बदल

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्स  : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), दासुन शनाका, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :

 विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), मायकल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज, विजय कुमार वैशाक

आरसीबीच्या संघात एक बदल

हार्दिक पांड्याने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवलाय. दुसरीकडे आरसीबीने संघात एक बदल केलाय. कर्ण शर्मा याला बाहेरचा रस्ता दाखवलाय. 

आरसीबीची प्रथम फलंदाजी

आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्या गुजरातने नाणेफेक जिंकली. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीचा संघ घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. पावसामुळे सामना अर्धा तास उशीराने सुरुवात झालाय. पावसामुळे मैदान संथ झालेले असेल. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणी येण्याची शक्यता आहे. 


 

गुजरातने नाणेफेक जिंकली

गुजरातने नाणेफेक जिंकली... प्रथम गोलंदाजीचा निर्णय

थोड्याच वेळात नाणेफेक होणार

पावसामुळे नाणेफेक उशीराने होणार

पावसाची विश्रांती

बेंगलोरमध्ये पावसाची विश्रांती... थोड्याच वेळात नाणेफेक होणार

नाणेफेक उशीराने

बंगलोरमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामना उशीराने सुरुवात होणार आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर होणार आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला सामना जिंकणे अनिवार्य आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास मुंबईचा थेट प्लेऑफमध्ये प्रवेश होईल. शनिवार आणि रविवारी दोन दिवस बेंगलोरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजता पावसाने विश्रांती घेतली होती.. पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे नाणेफेक उशीराने होणार आहे.

नाणेफेक उशीराने होणार

नाणेफेक उशीराने होणार

पावसाचा व्यत्यय...

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 70, RCB vs GT:  आज आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामातील (IPL 2023) शेवटचा साखळी सामना आरसीबी (Royal Challengers Bangalore) आणि गतविजेत्या गुजरात (Gujrat Titans) या दोन संघात पाहायला मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) रविवारी, 21 मे रोजी त्यांचा शेवटच्या लीग सामन्यासाठी घरच्या मैदानावर परतला आहे. आरसीबी संग होमग्राऊंड एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्सविरोधात खेळणार आहे. गुजरात संघाने आधील प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर आरसीबी शेवटच्या जागेसाठी प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे.


आरसीबीला गतविजेत्या गुजरात संघाचं आव्हान


गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोण्याची संधी आहे. त्यांनी आजचा सामना जिंकल्यास बंगळुरुला प्लेऑफ तिकीट मिळू शकतं. शिवाय आजच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यास आरसीबी नेट रनरेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. कारण, मुंबई संघाचा नेट रनरेट बंगळुरुपेक्षा कमी आहे.


RCB vs GT Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये गुजरात (GT) आणि बंगळुरु (RCB) या संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. यंदाच्या मोसमात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. गुजरात टायटन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.


पावसाचे सावट -


आरसीबी अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. आरसीबी संघाचा प्लेऑफ तिकीट आजच्या सामन्यात त्यांच्या विजयावर अवलंबून आहे. बंगळुरु आजच्या सामन्यात पराभूत झाल्यास संघ प्लेऑफमध्ये जाण्याची संधी गमावू शकतो. आजच्या सामन्याआधी बंगळुरु संघासमोर अडचणी वाढताना दिसत आहे. यामुळे आरसीबी संघ आणि त्याच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. बंगळुरूमध्ये शनिवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यासोबतच रविवारीही बंगळुरुमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


बंगळुरु संघासाठी प्लेऑफचं समीकरण काय?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी प्लेऑफच्या समीकरण जाणून घ्या. सध्या 13 सामन्यांतून सात विजयांसह आरसीबी संघाकडे 14 गुण आहेत. जर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर संघाला त्यांचा गुजरात विरोधातील शेवटचा साखळी सामना जिंकून 16 गुण मिळवावे लागतील. शिवाय, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव व्हावा किंवा मुंबईला कमी फरकाने विजय मिळावा, अशी इच्छा बाळगावी लागेल. यामुळे स्थितीत आरसीबीला 16 गुण मिळतील आणि त्याचा नेट रन रेटही मुंबईपेक्षा चांगला असेल. असे झाल्यास आरसीबीला प्लेऑफचं तिकीट मिळेल. पण सध्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे.


GT vs RCB, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात 21 मे रोजी रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.