RCB vs DC, IPL 2023 Live : आरसीबीचा दिल्लीवर 23 धावांनी विजय
RCB vs DC Match : दिल्ली पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे.. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सामना रंगणार आहे.
RCB vs DC, IPL 2023 Live : आरसीबीचा दिल्लीवर 23 धावांनी विजय
दिल्लीला नववा धक्का, अमन खान बाद
ललीत यादव बाद, दिल्लीला आठवा धक्का... दिल्लीला विजयासाठी 25 चेंडूत 65 धावांची गरज
अर्धशतकानंतर मनिष पांडे बाद, दिल्लीला सातवा धक्का
दिल्लीची फलंदाजी ढासळत असताना मनिष पांडे याने एकाकी झुंज दिली. मनिष फांडे याने 37 चेंडूत अर्धशतक झळकावले
दिल्लीला आणखी एक धक्का, अक्षर पटेल बाद
53 धावांत दिल्लीचा अर्धा संघ तंबूत...पोरेलही स्वस्तात बाद
दिल्लीला चौथा धक्का, कर्णधार डेविड वॉर्नर तंबूत
यश धल याला आजही मोठी खेळी करता आली नाही.. यश धुल स्वस्तात तंबूत परतलाय... दोन धावांवर दिल्लीला तिसरा धक्का बसलाय
दिल्लीची फलंदाजी ढेपाळली, तिसऱ्या षटकात तिसरी विकेट
दिल्लीला दुसरा धक्का, मिचेल मार्श बाद
दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ बाद
विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात 174 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीची फलंदाजी फिरकीसमोर ढेपाळली. दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांनी 11 षटकात फक्त 77 धावां खर्च केला अन् चार विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 175 धावांचे आव्हान आहे.
आरसीबीची १७४ धावांपर्यंत मजल
विराट कोहली याने दमदार अर्धशतक करत आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढासळली. एकापाठोपाठ एक विकेट गमावल्या. 132 धावसंख्येवर आरसीबीने लागोपाठ तीन विकेट गमावल्या. हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक एकापाठोपाठ एक बाद झाले. ग्लेन मॅक्सवेल आणि महिपाल लोमरोर यांना चांगली सुरुवात मिळाली पण मोठी खेळी करण्यात अपयश आले. तर हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिक अपयशी ठरले. हर्षल पटेल सहा धावा काढून तंबूत परतला तर कार्तिकला एकही धाव काढता आली नाही.
कुलदीपचा भेदक मारा, मॅक्सवेलनंतर कार्तिकही बाद
मॅक्सवेल बाद, आरसीबीला मोठा धक्का
आरसीबीला चौथा धक्का, अक्षर पटेलने हर्षल पटेलला पाठवले तंबूत
कर्णधार फाफ डु प्लेसिस याला चांगला सूर गवसला होता. फाफ याने सुरुवातीपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. फाफ याने विराट कोहलीसोबत ४२ धावांची भागिदारी केली. फाफ याने १६ चेंडूत २२ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. फाफ बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर याने विराट कोहलीची साथ दिली. लोमरोर याने २६ धावांची छोटेखानी खेळी केली. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले.
आरसीबीला तिसरा धक्का, लोमरोर बाद
एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. विराट कोहलीने 34 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने एक षटकार आणि सहा चौकार लगावले. विराट कोहलीचे आयपीएलच्या सोळाव्या हंगमातील तिसरे अर्धशतक होय.. चार डावात विराट कोहलीने तीन अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहली याने यंदाच्या हंगमात चार डावात 200 धावांचा पल्ला पार केलाय. त्याशिवाय चिन्नास्वामी स्टेडिअमवर विराट कोहलीने २५०० धावांचा पल्ला पार केला आहे. एकाच मैदानावर इतक्या धावा करणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. फाफ डु प्लेसिससोबत विराट कोहलीने ४.४ षटकात ४२ धावांची भागिदारी केली. त्यानंतर लोमरोर याच्यासोबतही ४७ धावांची भागिदारी केली.
यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने चार सामन्यात तीन अर्धशतके झळकावली आहेत.
आरसीबीला मोठा धक्का, विराट कोहली बाद
विराट कोहलीचे दमदार अर्धशतक... ३३ चेंडूत झळकावले अर्धशतक
विराट कोहलीने डाव सावरला... आरसीबीची सन्मानजक सुरुवात
आरसीबीला पहिला धक्का, कर्णधार फाफ २३ धावांवर बाद झाला... अमन खान याने जबरदस्त झेल घेतला.. मिचेल मार्श याने घेतली विकेट
विराट कोहली आणि फाफ मैदानावर... दोन षटकात पाडला धावांचा पाऊस
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार वैशाक.
दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
आरसीबी (RCB) आणि दिल्ली (DC) यांच्यात 15 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक दुपारी 3.00 वाजता होईल.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 190 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज बंगळुरु येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आरसीबीचा हा चौथा सामना असेल, तर दिल्लीचा हा पाचवा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी आरसीबी संघाने एक सामना जिंकला तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे दिल्ली संघाला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
थोड्याच वेळात सामन्याला होणार सुरुवात
पार्श्वभूमी
IPL 2023, Match 20, RCB vs DC : इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) 20 वा सामना आज, 15 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दिल्ली संघाने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत खेळलेले सर्व चार सामने गमावले आहेत. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) शनिवारी दुपारी 3.30 वाजता (RCB vs DC) हा सामना रंगणार आहे. बंगळुरूच्या घरच्या मैदानावर आज दिल्लीची कसोटी पाहायला मिळणार आहे.
RCB vs DC Match 20 Preview : आरसीबी आणि दिल्ली आमने-सामने
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज बंगळुरु येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आरसीबीचा हा चौथा सामना असेल, तर दिल्लीचा हा पाचवा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी आरसीबी संघाने एक सामना जिंकला तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे दिल्ली संघाला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
RCB vs DC Head to Head : कुणाचं पारड जड?
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 190 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
RCB vs DC , IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
आरसीबी (RCB) आणि दिल्ली (DC) यांच्यात 15 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक दुपारी 3.00 वाजता होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -