IPL 2024, RCB Playoff Scenario : दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 मधील 64 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला. दिल्लीच्या या विजयाचा फायदा आरसीबीला झालाय. त्यांचं प्लेऑफचं समिकरण आता सोपं झालेय. लखनौचं स्पर्धेतील आव्हान आता जवळपास संपुष्टात आले आहे. दिल्ली आणि लखनौ संघाची प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आता खूपच कमी राहिली आहे. दिल्लीच्या नावावर आता 14 सामन्यात 14 गुण झाले आहेत. तर लखनौच्या नावावर 13 सामन्यात 12 गुण आहेत. लखनौनं अखेरचा सामना जिंकला तर त्यांचे 14 गुण होतील. आरसीबीचेही अखेरचा सामना जिंकल्यानंतर 14 गुण होतील. पण दिल्ली आणि लखनौच्या तुलनेत आरसीबीचा रनरेट उत्तम आहे. त्यामुळे आरसीबीची प्लेऑपची संधी वाढणार आहे. पण त्यासाठी काही समिकरण आहेत. 


राजस्थानलाही फायदा - 


 दिल्लीच्या विजयाचा सर्वाधिक फायदा राजस्थान रॉयल्सला झाला आहे. राजस्थानल रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. राजस्थानचे आता 16 गुण आहेत, उर्वरित संघामध्ये फक्त हैदराबाद संघ 16 गुणांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय झालाय. 


आरसीबीचं प्लेऑफचं समीकरण कसं असेल ? 


आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे.  चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा सामना होणार आहे. चेन्नईने आरसीबीचा पराभव केला, तर ते थेट पात्र ठरणार आहेत. पण आरसीबीचा संघ मात्र समिकरणात अडकलाय. 


चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबादच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. जर हैदराबादचा उर्वरित दोन्ही सामन्यात पराभव झाला तर आरसीबी आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात. 


पावसाचे सावट - 


आरसीबी आणि चेन्नई यांच्यात 18 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडणार आहे. पण या दिवशी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 75 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना रद्द झाला तर आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात येईल. आशा स्थितीमध्ये चेन्नईचा संघ 15 गुणांसह प्लेऑफमध्ये दाखल होईल. जर हैदराबादने दोन्ही सामने गमावले तर दिल्ली आणि लखनौ संघाला संधी असेल.