RR vs LSG IPL 2025 : रोमांचक सामन्यात लखनौने राजस्थानला दोन धावांनी हरवले, आवेश खान ठरला हिरो; जैस्वालची मेहनत पाण्यात

शनिवारी संध्याकाळी आयपीएल 2025 मध्ये दुसरा सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे.

किरण महानवर Last Updated: 19 Apr 2025 11:25 PM

पार्श्वभूमी

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live Updates : शनिवारी संध्याकाळी आयपीएल 2025 मध्ये दुसरा सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना जयपूरमधील सवाई...More

रोमांचक सामन्यात लखनौने राजस्थानला दोन धावांनी हरवले

लखनौ सुपर जायंट्सने एका रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 2 धावांनी पराभव केला. आवेश खानने शेवटच्या षटकात सामना फिरवला. या षटकात आवेशने फक्त 6 धावा दिल्या आणि 1 विकेटही घेतली.


राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने चमकदार कामगिरी केली. त्याने 52 चेंडूत 74 धावा केल्या. यशस्वीने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. रियान परागने 39 धावांची खेळी केली. वैभव सूर्यवंशीने 34 धावांचे योगदान दिले. 


लखनौकडून अवेश खानने 3 विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि एडन मार्कराम यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळला.


प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 5 गडी गमावून 180 धावा केल्या. त्यासाठी आयुष बदोनीने 50 धावांची स्फोटक खेळी केली. तर एडेन मार्करमनेही 66 धावा केल्या. शेवटी अब्दुल समदने त्याची जादू दाखवली. तो 10 चेंडूत 30 धावा करून नाबाद राहिला.


राजस्थानकडून वानिंदू हसर्गाने 2 तर जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.