Rajasthan Royals vs Gujarat Titans Head To Head : आज टेबल टॉपर राजस्थान रॉयल्स आणि सातव्या क्रमांकावरील गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. जयपूरमधील सवाई मानसिंह मैदानावर संजू सॅमसनचा विजयरथ रोखण्याचं आव्हान युवा शुभमन गिल याच्यापुढे असेल. आजच्या सामन्यात बाजी मारुन विजयाच्या पटरीवर परतण्याचा गुजरातचा प्रयत्न असेल. तर राजस्थान रॉयल आपली विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. 

आयपीएलच्या 17 व्या हंगामात राजस्थानचा संघ अजेय आहे. त्यांनी चार सामन्यात विजय मिळवलाय, त्यामुळे गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. दुसरीकडे गुजरातने पाच सामन्यात फक्त दोन विजय मिळवले आहेत, गुजरातचा संघ सातव्या स्थानावर आहे. गुजरातचा संघ तिसऱ्या विजयासाठी मैदानावर उतरणार आहे. पण दोन्ही संघामध्ये वरचढ कोण आहे? सर्वाधिक धावा कुणी चोपल्या, विकेट कुणी घेतल्या? 

राजस्थान आणि गुजरात हेड टू हेड, कोणाचं पारड जड ?

आयपीएलच्या 17 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचं प्रदर्शन शानदार राहिले आहे. आतापर्यंत हा संघ अजेय आहे. गोलंदाजांशिवाय फलंदाजांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे. यशस्वी जायस्वालचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. संजू सॅमसन, जोस बटलर आणि रियान पराग भन्नाट फॉर्मात आहे. दुसरीकडे  गुजरातचा संघही संतुलीत आहे. आकडे पाहिल्यास गुजरातचे पारडे जड मानले जातेय. गुजरात आणि राजस्थान संघाचा आतापर्यंत पाच वेळा आमनासामना झाला. त्यामधील चार सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे. तर फक्त एका सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थानने बाजी मारली. आजच्या सामन्यात राजस्थानचं पारडं जड दिसत असले तर आकडे गुजरातच्या बाजूने आहेत.

आयपीएलच्या मागील हंगामात गुजरात आणि रजस्थान संघामध्ये दोनवेळा लढत झाली. ज्यामध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी एक एक विजय मिळवला. पहिला सामना गुजरातने 9 विकेटने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात राजस्थानने तीन विकेटने बाजी मारली. पण त्याआधी 2022 मध्ये गुजरातने सर्व तीन सामन्यात विजय मिळवला होता. 

सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर ? MOST RUNS IN RR vs GT IPL MATCHES

Batter Inns. Runs Avg. Strike Rate HS
हार्दिक पांड्या (GT) 5 228 114 159.44 87*
जोस बटलर (RR) 5 190 38 150.79 89
डेविड मिलर (GT) 4 177 177 175.24 68*

MOST WICKETS IN RR vs GT IPL MATCHES

Bowler Inns. Wkts. Econ. Avg. BBI
मोहम्मद शामी (GT) 5 7 8.35 23.85 3/25
हार्दिक पांड्या (GT) 5 7 6.55 13.57 3/17
राशीद खान (GT) 5 6 5.85 19.50 3/14

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11 -

यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकिटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, नांन्द्रे बर्गर, अवेश खान आणि युजवेंद्र चहल

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग 11 -

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विलियमसन, बीआर शरथ (विकेटकीपर), विजय शंकर, दर्शन नाळकंडे, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, स्पेंसर जॉनसन आणि नूर अहमद.