IPL 2022 Purple Cap : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थानच्या खेळाडूंनी ऑरेंज आणि पर्पल कॅपवर कब्जा मिळवलाय. ऑरेंज कॅप जोस बटलरकडे आहे तर पर्पल कॅप जयुवेंद्र चहलकडे आहे. यंदाच्या हंगामात यजुवेंद्र चहलने अचूक टप्प्यावर मारा करत फलंदाजांना तंबूत धाडलेय. पण रविवारी झालेल्या आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू वानंदु हसरंगा चहलच्या खूप जवळ आलाय. हैदराबादविरोधात पाच विकेट घेत हसरंगा पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. दोघांमध्ये फक्त एका विकेटचा फरक आहे. चहलच्या नावावर 22 विकेट आहेत. तर हसरंगा 21 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलने यंदाच्या हंगामात 11 सामन्यात 44 षटके गोलंदाजी केली आहे. प्रतिओव्हर 7.25 धावा खर्च केल्या आहे. 14.50 च्या सरासरीने चहलने 22 विकेट घेतल्यात... म्हणजे... प्रत्येक विकेटला चहलने 14 धावा खर्च केल्या आहेत. वानंदु हसरंगाने 12 सामन्यात 21 विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबचा कगिसो रबाडा 18, दिल्लीचा कुलदीप यादव 18 आणि हैदराबादचा नटराजन 17, अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
क्रमांक | गोलंदाज | सामने | विकेट | सरासरी | इकनॉमी रेट |
1 | युजवेंद्र चहल | 11 | 22 | 14.50 | 7.25 |
2 | वानिंदु हसरंगा | 12 | 21 | 15.33 | 7.85 |
3 | कगिसो रबाडा | 10 | 18 | 17.94 | 8.72 |
4 | कुलदीप यादव | 11 | 18 | 19.55 | 8.87 |
5 | टी नटराजन | 9 | 17 | 17.82 | 8.65 |
ऑरेंज कॅप -
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जोस बटलरच्या नावावर आहेत. बटलरने 11 सामन्यात 618 धावा चोपल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राहुलच्या नावावर 451 धावा आहेत. 389 धावांसह फाफ तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. शिखर 381 धावांसह चौथ्या तर 356 धावांसह वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे.
लखनौ पहिल्या क्रमांकावर -
गुणतालिकेत राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. लखनौने 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. गुजरातच्या संघानेही 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. नेटरनरेटच्या आधारावर लखनौचा संघ अव्वल स्थानावर आहे. राजस्थानचा संघ 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान संघाने 11 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. सध्या लखनौ, गुजरात, राजस्थान आमि आरसीबी हे चार संघ गुणतालिकेत अव्वल चार क्रमांकावर आहेत. तर मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्ली, हैदराबाद, पंजाब यांच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा आहे. तर कोलकाता आणि चेन्नईलाही संधी आहे, मात्र त्यांना इतर संघाच्या विजय आणि पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे.