PBKS vs DC Score Live IPL 2024: पंजाबचा दिल्लीवर चार विकेटनं विजय, आयपीएलची विजयानं सुरुवात

IPL 2024: Punjab Kings vs Delhi Capitals: मागच्या सत्रातील खराब कामगिरी विसरून दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आज आयपीएल 2024 मध्ये उत्कृष्ट सुरुवात करण्याच्या निर्धाराने खेळणार आहेत.

मुकेश चव्हाण Last Updated: 23 Mar 2024 07:20 PM
पंजाबचा दिल्लीवर चार विकेटनं विजय

पंजाबनं 2024 च्या आयपीएलमध्ये विजयी सुरुवात केली आहे.  पंजाबनं चार विकेट राखून विजय मिळवला. सॅम करन आणि लिविंगस्टन याच्या खेळीच्या जोरावर पंजाबनं विजय मिळवला.

पंजाबचा दिल्लीवर चार विकेटनं विजय

पंजाबनं 2024 च्या आयपीएलमध्ये विजयी सुरुवात केली आहे.  पंजाबनं चार विकेट राखून विजय मिळवला. सॅम करन आणि लिविंगस्टन याच्या खेळीच्या जोरावर पंजाबनं विजय मिळवला.

दिल्लीचे पंजाबला दोन धक्के, सॅम करन मोक्याच्या क्षणी बाद

दिल्लीचे पंजाबला दोन धक्के दिले आहेत. सॅम करन मोक्याच्या क्षणी बाद झाला. यामुळं पंजाब विरुद्ध दिल्लीची मॅच रंगतदार स्थितीत पोहोचली आहे.  

PBKS : पंजाबचा संघ विजयाच्या वाटेवर, सॅम करनची अर्धशतकी खेळी

सॅम करननं अर्धशतक झळकावल्यानं पंजाबचा संघ विजयाच्या वाटेवर आहे. पंजाबच्या 18 व्या ओव्हरपर्यंत 4 बाद 158 धावा झाल्या आहेत. 

पंजाबला विजयासाठी 7 ओव्हर्समध्ये 67 धावांची गरज

पंजाबला विजयासाठी 7 ओव्हर्समध्ये 67 धावांची गरज आहे. 

पंजाबला विजयासाठी 7 ओव्हर्समध्ये 67 धावांची गरज

पंजाबला विजयासाठी 7 ओव्हर्समध्ये 67 धावांची गरज आहे. 

PBKS : जितेश शर्मा अखेर जाळ्यात अडकलाच, पंजाबला चौथा धक्का

जितेश शर्मा अखेर जाळ्यात अडकला आहे. रिषभ पंतच्या स्टंपिंगमुळं पंजाबला चौथा धक्का बसला आहे. 

पंजाबला तिसरा धक्का,प्रभासिमरन बाद

दिल्लीनं पंजाबला तिसरा धक्का दिला आहे. प्रभासिमरन सिंग 26 धावा करुन बाद झाला आहे.

PBKS Score : पंजाबचं दमदार कमबॅक, प्रभासिमरन आणि सॅम करननं डाव सावारला

पंजाबनं मॅचमध्ये दमदार कमबॅक केलं आहे. शिखर धवन आणि बिअरस्टो बाद झाल्यानंतर  प्रभासिमरन आणि सॅम करननं डाव सावारला आहे. दोघांच्या भागिदारीमुळं पंजाबनं 9 व्या ओव्हरपर्यंत 80 धावांपर्यंत मजल मारली आहे.

Punjab Score : पंजाबच्या पाच ओव्हर्समध्ये 50 धावा पूर्ण

Punjab Score : पंजाबच्या पाच ओव्हर्समध्ये 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. पंजाबनं 5 ओव्हरनंतर 2 बाद 52 धावा केल्या आहेत. 

पंजाबचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले, इशांत शर्मा ठरला कारण

दिल्लीच्या 174 धावांचा पाठलाग करताना पंजाबचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. शिखर धवन 22 धावा करुन बाद झाला. इशांत शर्मानं त्याला बाद केलं. तर, दुसरीकडे जॉनी बिअरस्टो धावबाद झाला आहे. 

Shikhar Dhawan: दिल्लीला पहिला धक्का, शिखर धवन बाद

दिल्लीला पहिला धक्का बसला आहे. शिखर धवन 22 धावा करुन बाद झाला आहे. इशांत शर्मानं त्याला बाद केलं. 

PBKS Score : पंजाबची आक्रमक सुरुवात, पहिल्या ओव्हरमध्ये काढल्या 17 धावा

PBKS Score : पंजाबची आक्रमक सुरुवात, पहिल्या ओव्हरमध्ये काढल्या 17 धावा

दिल्लीचा डाव सावरला, पंजाबपुढं 175 धावांचं आव्हान

दिल्लीचा खेळाडू पोरेल यानं 20 व्या ओव्हरमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्यानं तीन चौकार, दोन षटकारांसह अखेरच्या ओव्हरमध्ये 25 धावा काढल्या. यामुळं दिल्लीनं 20 ओव्हरमध्ये 9 बाद 174 धावा केल्या. पंजाबपुढं 175 धावांचं आव्हान विजयासाठी दिल्लीनं ठेवलं आहे. 

दिल्लीला सातवा धक्का, अक्षर पटेल धावबाद

दिल्लीच्या टीमला सलग धक्के बसत गेल्यानं त्यांनी 17 ओव्हर्समध्ये 7 बाद 138 धावा केल्या आहेत. दिल्लीचा कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. अक्षर पटेल 20 धावा करुन धावबाद झाला. 

दिल्लीला 5 वा धक्का, रिकी भुई बाद

 दिल्लीला 5 वा धक्का बसला आहे. रिकी भुई केवळ 3 धावा करुन बाद झाला आहे.  

दिल्लीला चौथा धक्का, रिषभ पंत 18 धावा करुन बाद 

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत 18 धावा करुन बाद झाला आहे. दिल्लीची अवस्था 4 बाद 111 अशी झाली आहे.

DC Score : दिल्ली कॅपिटल्सच्या 100 धावा पूर्ण

दिल्ली कॅपिटल्सनं 12 व्या ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या आहेत. दिल्लीचा कॅप्टन  रिषभ पंत मैदानावर बॅटिंग करत आहे. 

DC Score : दिल्ली कॅपिटल्सच्या 100 धावा पूर्ण

दिल्ली कॅपिटल्सनं 12 व्या ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या आहेत. दिल्लीचा कॅप्टन  रिषभ पंत मैदानावर बॅटिंग करत आहे. 

DC Score Update : दिल्लीला तिसरा धक्का, होप 33 धावांवर बाद

दिल्लीला तिसरा धक्का बसला आहे.  होप 33 धावा करुन बाद झाला आहे. रबाडाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट गेली.

रिषभ पंतचं मैदानावर कमबॅक, प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन 

रिषभ पंतचं मैदानावर कमबॅक, प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन 





दिल्लीला दुसरा धक्का, डेव्हिड वॉर्नर 29 धावांवर बाद

दिल्लीला दुसरा धक्का बसला आहे. डेव्हिड वॉर्नर 29 धावांवर बाद झाला आहे. यानंतर रिषभ पंत अखेर मैदानात फलंदाजीला दाखल झाला आहे. 

DC Score Update : दिल्ली कॅपिटल्सच्या 50 धावा पूर्ण

DC Score Update :  दिल्ली कॅपिटल्सच्या 50 धावा पूर्ण झाल्या असून एक विकेट गेली आहे. डेव्हिड वॉर्नर  आणि होपची जोडी मैदानावर आहे.  

Delhi Capitals Team : दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये कुणाचा समावेश

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), अक्षर पटेल, ललित यादव, कुमार कुशाग्रा/अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे.

Punjab Kings Team : पंजाबच्या संघात कोणाला संधी?

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, ऋषी धवन/ हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

DC vs PBKS live Score Updates: शिखर धवननं नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदीजाचा निर्णय

IPL 2024 : पंजाबचा कर्णधार शिखर धवन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  दिल्ली प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

DC vs PBKS live Score Updates: पंजाब किंग्सचे घरचे मैदान बदलले-

Delhi Capitals Vs Punjab Kings: आयपीएल 2024 पासून पंजाबचे घरचे मैदान बदलले आहे. आतापर्यंत पंजाबचा संघ मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळत होता, पण आता त्यांचे सामने महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियमवर होणार आहेत. त्याची पायाभरणी 2008 साली झाली. त्याची प्रेक्षक क्षमता अंदाजे 33000 आहे. मात्र, त्यात अद्याप एकही मोठा सामना खेळला गेला नाही आणि पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना हा पहिलाच मोठा सामना असेल. थोड्याच वेळात टॉस होणार आहे.





DC vs PBKS live Score Updates: दिल्ली कॅपिटल्स अन् पंजाब किंग्समध्ये चुरशीची स्पर्धा

IPL 2024: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 32 सामने झाले असून त्यात दिल्ली आणि पंजाबने 16-16 असा विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून कोण आघाडी घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





सेहवाग आणि वॉर्नरच्याही पुढे पंत

दिल्ली कॅपिटल्स संघात भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरसारखे दिग्गज खेळाडू आहेत. या संघाकडून खेळताना त्याने बरेच यशही मिळवले आहे. पण ऋषभ पंत या सर्व दिग्गजांपेक्षा पुढे आहे. दिल्लीसाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये पंतचाही समावेश आहे. या फ्रँचायझीसाठी तो आतापर्यंत 97 सामने खेळला आहे. या कालावधीत त्याने एकूण 2838 धावा केल्या आहेत. या फ्रँचायझीसाठी पंतपेक्षा इतर कोणत्याही फलंदाजाने जास्त धावा केल्या नाहीत. पंतनंतर माजी कर्णधार वॉर्नरचा क्रमांक येतो. वॉर्नरने दिल्लीसाठी 82 सामने खेळले असून त्याने एकूण 2404 धावा केल्या आहेत, तर वीरेंद्र सेहवाग 2382 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

पंजाब किंग्स कोणत्या ११ खेळाडूंना मैदानात उतरवणार?

जिंकणं हाच एक उद्देश; दिल्ली कॅपिटल्सचं

पुनरागमन करणारे ऋषभ पंत आणि शिखर धवन आज आमनेसामने, कोण जिंकणार?

आज ऋषभ पंत आणि शिखर धवन आमनेसामने येणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, हे महत्वाचे ठरणार आहे.

पंजाबच्या फलंदाजांनी आज कहर केल्यास दिल्लीच्या अडचणी वाढणार; पाहा 3 शिलेदारांची नावं!

जॉनी बेअरस्टोचा फॉर्म चिंतेचा कारण

पंजबा किंग्सचा यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्मा संघाचा नवा उपकर्णधार असेल. मात्र, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत जॉनी बेअरस्टोचा खराब फॉर्म निश्चितच पंजाबसाठी चिंतेचा विषय आहे. संघाकडे सिकंदर रझा, सॅम कुरन, लियामा लिव्हिंगस्टोन यांच्या रूपाने चांगले अष्टपैलू खेळाडू असले तरी. रबाडा, अर्शदीप, हर्षल पटेल यांच्या रूपाने त्यांची गोलंदाजीही मारक आहे.





सरावासाठी मैदानात दाखल होताच ऋषभ पंतने काय केले?

PBKS vs DC Score Live IPL 2024: पंजाब किंग्स सज्ज

PBKS vs DC Score Live IPL 2024: दिल्ली कॅपिटल्स अन् पंजाब किंग्ची पाहा संभाव्य Playing XI

पंजाब किंग्सची संभाव्य Playing XI: शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, जॉनी बेयरस्टो, लियम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सैम कर्रन, ऋषि धवन, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहार, अर्शदीप सिंह.


दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing XI: डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत ( कर्णधार आणि विकेटकीपर), ट्रस्टन स्टब्स, ललित यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मुकेश यादव, आंद्रे नॉर्खिया.

खेळपट्टी कशी असणार?

महाराजा यदाविंद्र स्टेडियममध्ये आयपीएलची पहिलीच मॅच खेळवली जात आहे.यापूर्वी या मैदानावर झालेले इतर सामने कमी धावसंख्येचे झाल्यानं या मैदानावरील पीचला लो स्कोअरिंग पीच म्हणनं चुकीचं ठरणार नाही.  टॉस जिंकणाऱ्या संघाला पहिल्यांदा बॅटिंग करण्यात अडचण येणार नाही. फलंदाजांना चौकार षटकार मारण्यात अडचणी येऊ शकतात. या पीचवर गोलंदाज अधिक भेदक मारा करण्याची शक्यता आहे. दिल्लीकडे अक्षर पटेल आणि कुलदीप यादव सारखे दोन आंतरराष्ट्रीय स्पिनर आहेत. जे पंजाबपुढं अडचणी निर्माण करु शकतात. 

पार्श्वभूमी

IPL 2024: Punjab Kings vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) टी-20 क्रिकेटमध्ये आज दुपारच्या सत्रात (3.30 वाजता) ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) संघासमोर पंजाब किंग्सचे (PBKS) आव्हान असणार आहे. भीषण अपघातातून बचावल्यानंतर आपल्या जिद्दीच्या जोरावर वर्षभराहून अधिक कालावधीनंतर ऋषभ पंत आज क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. मागच्या सत्रातील खराब कामगिरी विसरून दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स शनिवारी आयपीएल 2024 मध्ये उत्कृष्ट सुरुवात करण्याच्या निर्धाराने खेळणार आहेत. 





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.