Punjab Kings Playing XI IPL 2026 : आयपीएल 2026 च्या लिलावात युवा खेळाडूंसाठी संघांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी कोट्यवधींची उधळण करत लिलावात खळबळ उडवली. मात्र, पंजाब किंग्सचा अंदाज काहीसा वेगळा आणि संयमी होता. या संघाने केवळ चार खेळाडूंवर बोली लावत आपला संघ पूर्ण केला. मागील हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स अवघ्या एका पावलाने ट्रॉफीपासून दूर राहिली होती.
11.50 कोटींच्या पर्ससह उतरली पंजाब
आयपीएल 2026 च्या लिलावात पंजाब किंग्स दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी पर्स घेऊन उतरली होती. लिलावाच्या सुरुवातीला त्याच्या खात्यात फक्त 11.50 कोटी रुपये होते. त्यामुळेच फ्रँचायझीने मोजक्या खेळाडूंवरच लक्ष केंद्रित करत फक्त चार खेळाडूंवर बोली लावली. एक्सीलरेटेड राऊंडमध्ये पंजाबने आपला पहिला खेळाडू निवडला. ऑस्ट्रेलियाचा युवा बॅटिंग ऑलराउंडर कूपर कॉनॉली याच्यासाठी पंजाबने 3 कोटी रुपये खर्च केले. ही बोली केकेआरकडून कॉनॉली ‘हायजॅक’ करत जिंकली गेली.
बेन ड्वारशुइसवरही खर्च
कूपर कॉनॉलीनंतर पंजाब किंग्सने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज बेन ड्वारशुइसवरही पर्स हलका केला. या खेळाडूसाठी पंजाबने 4.40 कोटी रुपये मोजले. आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी पंजाब किंग्सने आपल्या संघात फारसे मोठे बदल केले नव्हते. बहुतांश खेळाडूंना त्यांनी रिटेन केले होते.
दरम्यान, पंजाब किंग्सने रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये सर्वात मोठे नाव ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलचे होते. 2025 च्या हंगामात मॅक्सवेल अपेक्षांवर उतरू शकला नव्हता आणि दुखापतीमुळे त्याला मध्यातच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर-बल्लेबाज जोश इंग्लिसलाही संघाने रिलीज केले.
पंजाब किंग्जने हे खेळाडू खरेदी केले...
बेन द्वारशीस - 4.4 कोटी कूपर कॉनोली - 3 कोटी प्रवीण दुबे - 30 लाखविशाल निषाद - 30 लाख
पंजाब किंग्सचा संघ- (IPL 2026 PBKS Full Squad)
प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुशीर खान, प्याला अविनाश, हरनूर पन्नू, सूर्यांश शेडगे, मिशेल ओवेन, जेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्यूसन, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, विष्णु विनोद, कूपर कॉनोली, बेन ड्वार्शुइस, प्रवीण दुबे, विशाल निषाद
पंजाब किंग्जची प्लेइंग 11 : प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, कूपर कोनेली, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैश्य, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन.
हे ही वाचा -