IPL 2023, MI vs GT :  गतविजेता गुजरात टायटन्स (GT) वानखेडेच्या मैदानावर आज पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध लढणार आहे.  यजमान मुंबईचा संघ पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. गुजरात संघाने अहमदाबादमध्ये मुंबईला 57 धावांनी हरवले होते. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित शर्मा सज्ज झालाय.  गुजरात संघ सध्या आयपीएल 2023 गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर मुंबई इंडियन्स संघानेही आरसीबीचा पराभव करत पहिल्या चारमध्ये स्थान पटकावलेय. आजच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय. या रंगतदार लढतीत काही लढती लक्षवेधक आहेत. पाहूयात त्याबद्दल


रोहित शर्मा Vs अल्जारी जोसेफ :


मुंबईचा कर्णधार रोहिथ शर्मा वेगवान गोलंदाजीविरोधात आधिक आक्रमकपणे फलंदाजी करतो. गुजरातमध्ये अल्जरी जोसेफ आणि मोहम्मद शमी यासारखे वेगवान गोलंदाज आहेत. रोहित शर्मा गुजरातविरोधात मोठी खेळी करु शकतो. रोहित शर्मा सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे... पण गुजरातविरोधात निर्णायक योगदान देऊ शकतो. रोहित शर्मा याने आतापर्यंत अल्जारी जोसेफ याचा समाचार घेतलेय. अल्जारी जोसेफ याच्याविरोधात रोहित शर्मा २३४ च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडतो. रोहित शर्मा याने अल्जारी जोसेफ याच्या २४ चेंडूत ५६ धाा काढल्यात.


सूर्यकुमार यादव Vs अल्जारी जोसेफ :


रोहित शर्मा याच्याशिवाय मधल्याफळीतल सूर्यकुमार यादवही अल्जारी जोसेफ याच्याविरोधात आक्रमक फलंदाजी करतो. सूर्यकुमार यादव याने अल्जारी जोसेफ याच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडलाय. सूर्यकुमार यादव याने अल्जारी जोसेफ याच्या गोलंदाजीवर २३७ च्या स्ट्राईक रेटने ५२ धावा चोपल्या आहेत.  


रोहित शर्मा Vs राशिद खान :


रोहित शर्मा आणि राशिद खान यांच्यातील सामनाही रंगतदार राहिलाय. आतापर्यंत राशिद खान याने रोहित शऱ्मा याला तीन वेळा बाद केलेय. तर रोहित शर्मा याने राशिद खान याच्या  29 चेंडूवर 43 धावा काढल्या आहेत


ईशान किशन Vs मोहम्मद शमी :


आयपीएलमध्ये ईशान किशन आणि मोहम्मद शमी यांच्यातील लढाई रंगतदार राहिली आहे.  मोहम्मद शमी विरोधात ईशान किशन याची बॅट शांत राहते... पण आतापर्यंत शमीला ईशान किशन याला एकदाही बाद करता आलेले नाही. ईशान किशन याने शमीच्या विरोधात ४२ चेंडूत ४२ धावा काढल्या आहेत.  


MI vs  GT Head To Head :  हेड टू हेड, काय स्थिती ? 


मुंबई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत 2 वेळा आमना-सामना झाला आहे. यामध्ये मुंबई आणि गुजरात यांनी प्रत्येकी 1 - 1 सामना जिंकला आहे. आकड्याची लढाई बरोबरीत आहे... दोन्ही संघामध्ये आजची लढाई रंगतदार होण्याची शक्यता आहे.