IPL 2023, MS Dhoni And Sunil Gavaskar : आयपीएलचा सोळा हंगाम उत्तारार्धाकडे झुकलाय.. अंतिम टप्प्यात आयपीएल अतिशय रोमांचक होत चालेलय. 61 सामन्यानंतरही अद्याप एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही. रविवारी चेन्नईने घरच्या मैदानावरील आपला अखेरचा सामना खेळला. या सामन्यात कोलकात्याने चेन्नईचा सहा विकेटने पराभव केला. रिंकू सिंह आणि नीतीन राणा यांनी 99 धावांची भागिदारी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला. चेन्नईला घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यानंतर चेपॉकच्या मैदानार खास क्षण पाहायला मिळाला. चेपॉक मैदानावर प्रेक्षकांचे धोनीप्रति प्रेम दिसून आले. यामध्ये दिग्गज माजी खेळाडू सुनील गावसकर यांचाही समावेश होता. सुनील गावसकर यांनी धोनीचा ऑटोग्राफ घेतला.. तोही आपल्या शर्टवर... 


माहीचा फॅन आहेत गावसकर - 
सुनील गावसकर यांनी धोनीची ऑटोग्राफ घेतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. गावसकरांनी आपल्या शर्टवर धोनीची ऑटोग्राफ घेतली. दोघांनी एकमेंकाची गळाभेटही घेतला. या खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गावसकरांनी स्वत: धोनीकडे ऑटोग्राफ मागितली होती. दिग्गज खेळाडू धोनीचा चाहताय, याची सोशल मीडियावर चर्चा आहे. गावसकरांनी अनेकदा धोनीचे कौतुक केलेय. त्याशिवाय आयपीएलमध्ये खेळायची संधी मिळाली असती तर धोनीच्या नेतृत्वात खेळलो असतो.. असेही सांगितले होते. सामन्यानंतर धोनीबद्दल बोलताना गावसकर म्हणाले की, धोनीसारखा खेळाडू शेकडो वर्षातून एकदा तयार होतो.. 






रिंकूला दिली ऑटोग्राफ - 


MS Dhoni And Rinku Singh :  कोलकात्याने सामन्यात बाजी मारली. यामध्ये रिंकूचा मोठा वाटा होता. या विजयानंतर रिंकू सिंह याला धोनीचा ऑटोग्राफ मिळाली. सामन्यानंतर रिंकूने धोनीकडून ऑटोग्राफ घेतली. याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  







चेपॉकवर प्रेक्षकांची गर्दी, धोनीसह चेन्नईच्या संघाने जिंकले मन - 


यंदाच्या हंगामातील चेन्नईच्या चेपकॉवरील अखेरच्या सामन्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एमएस धोनीसह संघातील इतर खेळाडूंनी मैदानाला गोल चक्कर मारत प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले. धोनीने प्रेक्षकांकडे चेंडू टाकल्यानंतर हा क्षण आणखी खास झाला. सर्व खेळाडूंनी चेपॉक मैदानावर आलेल्या प्रेक्षकांचे मन जिंकले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेपॉकवरच्या मैदानावर धोनीने प्रेक्षक आणि संघासोबत सेल्फीही घेतला..