PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE: पंजाबनं पाचवी विकेट्स गमावली! लिव्हिनस्टोन बाद, सामना रोमांचंक स्थितीत

Punjab vs Bangalore, IPL 2022: आयपीएलच्या(IPL) पंधराव्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore ) आणि पंजाब किंग्जशी (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे.

abp majha web team Last Updated: 27 Mar 2022 11:20 PM
IPL 2022: शाहरूख खानमुळं आरसीबीचा पराभव, रोमांचक सामन्यात पंजाबचा 5 विकेट्सनं विजय

मुंबईच्या डी. वाय स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघानं आरसीबीला विकेट्सनं परभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिलाय. 


 


 

IPL 2022: पंजाबनं पाचवी विकेट्स गमावली, लिव्हिनस्टोन बाद, सामना रोमांचंक स्थितीत

आरसीबीविरुद्ध सामन्यात पंजाबच्या संघानं लिव्हिनस्टोनच्या रुपात त्यांची पाचवी विकेट्स गमावली आहे.  विजयासाठी पंजाबला 30 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे.

PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE: पंजाबला तिसरा धक्का

PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE:  पंजाबला तिसरा धक्का, राजपक्षेला सिराजने केले बाद, पंजाबच्या तीन बाद 139 धावा 

पंजाबच्या संघाला पहिला झटका

पंजाबच्या संघाला पहिला झटका लागलाय. हसरंगाच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली आहे. सध्या पंजाबचा स्कोर 76 धावा इतका आहे. शिखर धवन अजूनही मैदानात उपस्थित आहे. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे.

पंजाबच्या सलामीवीरांनी आरसीबीच्या गोलंदाजाची घेतली शाळा

आरसीबीच्या संघानं दिलेल्या 206 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाची सुरुवात चांगली झाली आहे. पंजाबचे सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहे. पंजाबच्या संघानं 4.3 षटकात 50 धावांचा टप्पा गाठला आहे.

PKBS Vs RCB: आरसीबीचं पंजाबसमोर 206 धावांचं लक्ष्य

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात पंजाब आणि बंगळुरू यांच्यात मुंबईच्या डी.व्हाय.पाटील स्टेडीअमवर सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या संघानं पंजाबसमोर 20 षटकात 2 विकेट्स गमावून 206 धावांचं लक्ष्य ठेवलंय. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं विस्फोटक फलंदाजी केलीय. त्यानं 57 चेंडूत 88 धावा केल्या आहेत. ज्यात सात षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. याशिवाय, आरसीबीचा माजी कर्णधार आणि दिनेश कार्तिक यांनीही आक्रमक खेळी दाखवलीय.

फाफ डू प्लेसिसची विस्फोटक खेळी संपुष्टात, शाहरूख खानच्या गोलंदाजीवर गमावली विकेट्स, आरसीबीला दुसरा झटका

पंजाबविरुद्ध सामन्यात बंगळुरूनं फाफ डू प्लेसिसच्या रुपात दुसरा विकेट्स गमावली आहे. या सामन्यात विस्फोटक फलंदाजी करणार फाफ डू प्लेसिसनं पंजाबचा गोलंदाज शाहरुख खानच्या गोलंदाजीवर विकेट्स गमावली आहे. त्यानं 57 चेंडूत 88 धावा केल्या आहे. 


 


 

आजी-माजी कर्णधाराची जोरदार फटकेबाजी, आरसीबीचा स्कोर 142 वर

मुंबईच्या डी.व्हाय पाटील स्डेडिअमवर पंजाब विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीच्या संघानं 15 व्या षटकात 142 धावा केल्या आहेत. आरसीबीचा कर्णधार फॅफ डू प्लेसिस आणि माजी कर्णधार विराट कोहली जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे.

PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE: आरसीबीला पहिला धक्का, अनुज रावत बाद

PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE: पंजाबचा फिरकी गोलंदाज राहुल चाहरने आरसीबीला पहिला धक्का दिला आहे. अनुज रावत याला 21 धावांवर बाद केले. सात षटकानंतर आरसीबीने एक बाद 50 धावा चोपल्या आहेत. विराट कोहली आणि फाफ मैदानावर आहेत. 

PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE: आरसीबीची प्लेईंग 11

PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE:  आरसीबीची प्लेईंग 11





PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE: पंजाबची प्लेईंग 11

PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE: पंजाबची प्लेईंग 11 





PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE: पंजाबने नाणेफेक जिंकली

PBKS Vs RCB, IPL 2022 LIVE: पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पार्श्वभूमी

Punjab vs Bangalore, IPL 2022: आयपीएलच्या(IPL) पंधराव्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore ) आणि पंजाब किंग्जशी (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. दरम्यान, फॅफ डू प्लेसिस बंगळुरूचं नेतृत्व करणार आहे. तर, मयांक अगरवाल पंजाबचं कर्णधारपदं संभाळणार आहे.  या सामन्यात बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली कशी कामगिरी करतो? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. कर्णधारपद सोडल्यानंतर विराट आता दडपणमुक्त खेळणार आहे. 


पंजाब आणि बंगळुरू यांच्यात आज मुंबईच्या डी. व्हाय. पाटील स्टेडिअमवर होणारा सामना रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. या सामन्यातील दोन्ही संघाचे कर्णधार आपपल्या संघाचं पहिल्यांदाच नेतृत्व करीत आहे. दरम्यान, चेन्नईनं रिलीज केल्यानंतर फॅफ डू प्लेसिसला बंगळुरूच्या संघानं खरेदी केलं. तसेच त्याच्यावर संघाची जबाबदारी सोपवली. तर, पंजाब माजी कर्णधार केएल राहुल लखनौच्या संघात सामील झाला. त्यानंतर  संघ व्यवस्थापनानं मयांक अग्रवालला संघाचं नेतृत्व दिलं.


बंगळुरूचा संघ
विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (सात कोटी), फाफ ड्यू प्लेसी (7 कोटी), हर्षल पटेल (10.75 कोटी), वानिंदू हसारंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी), जोश हेझलवूड (7.75 कोटी), शाहबाज अहमद (2.4 कोटी), अनुज रावत (3.4 कोटी), आकाशदीप (20 लाख), फिन अलन (80 लाख), शेरफन रुदरफर्ड (1 कोटी), जेसन बेहरनडॉर्फ (75 लाख), सुयश प्रभुदेसाई (30 लाख), अनीश्वर गौतम (20 लाख).


पंजाबचा संघ
मयांक अगरवाल (12 कोटी), अर्शदीपसिंग (4 कोटी), शिखर धवन (8.25 कोटी), कागिसो रबाडा (9.25 कोटी), जॉनी बेअरस्टो (6.75 कोटी), राहुल चहर (5.25 कोटी), शाहरुख खान (9 कोटी), हरप्रीत ब्रार (3.80 कोटी), प्रभसिमरनसिंग (60 लाख), जितेश शर्मा (20 लाख), ईशान पोरेल (25 लाख), लियाम लिव्हिंगस्टोन (11.5 कोटी), ओडियन स्मिथ (6 कोटी), संदीप शर्मा (50 लाख), राज बावा (2 कोटी), ऋषी धवन (55 लाख), प्रेरक मंकड (20 लाख), वैभव अरोरा (2 कोटी), ऋतिक चॅटर्जी (20 लाख), बलतेज धांडा (20 लाख), अंश पटेल (20 लाख).



हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.