नवी दिल्ली : आयपीएलचं 17 (IPL 2024) वं पर्व आता रोमांचक स्थितीत पोहोचलं आहे. आयपीएलमधील 58 मॅच पूर्ण झाल्यानंतर देखील प्लेऑफचं तिकीट कुणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एकही संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. दुसरीकडे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सर्वात पहिल्यांदा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. मुंबईनंतर आणखी एका संघाचे प्लेऑफमधील प्रवेशाचे दार बंद झालं आहे. पंजाब किंग्जला (Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानं त्यांचा प्लेऑफ प्रवेश आता शक्य होणार नाही. पंजाब किंग्जनं 12 मॅचमध्ये केवळ चार मॅचमध्ये विजय मिळवला तर त्यांना 8 मॅचेसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आता पंजाबनं राहिलेल्या दोन मॅच जिंकल्यातरी ते 12 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. दुसरीकडे आरसीबीसाठी प्लेऑफ प्रवेशाची शक्यता अजून संपलेली नसली तरी त्यांच्यासाठी मार्ग खडतर असेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 12 मॅचमध्ये 5 मॅचेसमध्ये विजय मिळवला आहे. आरसीबी सध्या 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध विजय मिळवला तर त्यांचे 14 गुण होतील. आरसीबी जर 14 गुणांपर्यंत पोहोचलं तरी त्यांना प्लेऑफसाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.
आयपीएलमध्ये सध्या राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांकडे 16 गुण आहेत. तर, सनरायजर्स हैदरादबादकडे 14 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जाएंटस या संघांना राहिलेल्या मॅचेसमध्ये विजय मिळवता येऊ नये, अशी आशा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला करावी लागेल.
मुंबई आणि पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाद
गुणतालिकेत सध्या टॉपवर कोलकाता नाईट रायडर्स आहे. 16 गुणांसह चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर कोलकातानं पहिलं स्थान पटकावलं आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्स असून त्यांचे देखील 16 गुण आहेत. दोन्ही संघांच्या अजून तीन मॅचेस शिल्लक आहेत. सनरायजर्स हैदराबादच्या नावावर 14 गुण असून त्यांचा दोन मॅचेस शिल्लक आहेत. लखनौ सुपर जाएंटस, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याकडे 12 गुण आहेत. चेन्नई चौथ्या, दिल्ली पाचव्या तर लखनौ सहाव्या स्थानी आहे. आरसीबी सातव्या स्थानावर असून मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. मात्र, दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. गुजरात गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या :
KL Rahul : लखनौ सुपर जाएंटस केएल राहुलविरोधात मोठी पावलं उचलणार, कॅप्टनपद जाऊ शकतं अन्...
पंजाब किंग्सचे आव्हान संपुष्टात, आरसीबीचा 60 धावांनी विजय, प्लेऑफच्या आशा जिवंत