PBKS vs MI, IPL 2023 Live: पंजाब आणि मुंबई यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

PBKS vs MI Live Score: मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांना मागील सामन्यात विजय मिळवला आहे. मागील सामन्यात पंजाबनं चेन्नईचा चार विकेटने पराभव केला. तर, मुंबईनं राजस्थानवर विजय मिळवला.

नामदेव कुंभार Last Updated: 03 May 2023 11:09 PM
मुंबईचा पंजाबवर सहा विकेटने विजय

मुंबईचा पंजाबवर सहा विकेटने विजय

ईशान किशन-सूर्यकुमारने केली पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई 

सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी पंजाबच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार आणि ईशान किशन यांनी 55 चेंडूत 116 धावांचा पाऊस पाडला. पंजाबच्या प्रत्येक गोलंदाजांचा यांनी समाचार घेतला. दोघांनीही केलेल्या विस्फोटक फलंदाजीमुळे मुंबईने धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. ईशान किशन याने 41 चेंडूत 75 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने चार षटकार आणि सात चौकार लगावले. ईशान किशन याने कॅमरुन ग्रीन याच्यासोबत  54 धावांची भागिदारी करत मुंबईच्या डावाला आकार दिला. त्यानंतर सूर्यकुमार यादवसोबत मुंबईला विजयाच्या दिशेन नेहले. सूर्यकुमार यादव याने 31 चेंडूत 66 धावांचा पाऊस पाडला. सूर्यकुमार यादव याने वादळी फलंदाजी करत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सूर्यकुमार यादव याने आपल्या खेळीत दोन षटकार आणि आठ चौकार लगावले. 

मुंबईला चौथा धक्का, ईशान किशन बाद

मुंबईला चौथा धक्का, ईशान किशन बाद झाला. 41 चेंडूत 75 धावा काढून बाद झाला

मुंबईला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद

मुंबईला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद झाला. सूर्यकुमार यादव याने 31 चेंडूत 66 धावांची खेळी केली.

मुंबईला दुसरा धक्का, कॅमरुन ग्रीन बाद

मुंबईला दुसरा धक्का, कॅमरुन ग्रीन बाद झाला आहे. ग्रीन याने 23 धावांचे योगदान दिलेय.

मुंबईचे अर्धशतक

मुंबईचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. कॅमरुन ग्रीन आणि इशान किशन यांनी वादळी खेळी करत पाच षटकात 50 धावांचा टप्पा पार केला.

मुंबईला मोठा धक्का

मुंबईला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा शून्यावर बाद झालाय.

पंजाबची 214 धावांपर्यंत मजल

पंजाबची 214 धावांपर्यंत मजल.... मुंबईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान

लिव्हिंगस्टोनची वादळी फलंदाजी

लिव्हिंगस्टोनची वादळी फलंदाजी सुरु आहे. 24 चेंडूत 44 धावा केल्या आहेत.

पंजाबला तिसरा धक्का

पंजाबला तिसरा धक्का बसला आहे. शिखर धवन 30 धावांवर बाद झालाय. तर मॅथ्यू शॉर्ट 27 धावांवर तंबूत परतला. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा मैदानावर आहेत.

पंजाबला पहिला धक्का

पंजाबला पहिला धक्का बसला आहे. प्रभसिमरन 9 धावांवर बाद झालाय

पंजाब किंग्स - 

प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत बराड़, ऋषी धवन, राहुल चाहर, अर्शदीप सिंह.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11  - 

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, तिलक वर्मा, टिम डेविड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अरशद खान. 

IPL 2023 MI vs PBKS : मुंबई आणि पंजाब आमने-सामने

मुंबईनं यंदाच्या हंगामातील विजयी सुरुवात उशीरा केली असली, तरी त्यानंतर संघ चांगल्या स्थितीत दिसत आहे. पंजाबने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले असून चार सामने गमावले आहेत. दुसरीकडे मुंबई संघाने आतापर्यंत आठ पैकी चार सामन्यांत विजय मिळवला, तर चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

Mohali Pitch Report : मोहालीची खेळपट्टी कशी आहे?

मोहालीतील (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association) आयएस बिंद्रा स्टेडिअमवर आजचा सामना रंगणार आहे. या मैदानाची  खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला

MI vs PBKS Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघात आतापर्यंत 30 सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही संघांची स्थिती समान आहे. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघांनी प्रत्येकी 15-15 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 200 आहे. 

मुंबईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

मुंबईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 46, PBKS vs MI: इंडियन प्रीमियर लीगच्या 46 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) दोन संघ आमने-सामने येणार आहेत. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांना मागील सामन्यात विजय मिळवला आहे. मागील सामन्यात पंजाबनं चेन्नईचा चार विकेटने पराभव केला. तर, मुंबईनं राजस्थानवर विजय मिळवला.

IPL 2023 MI vs PBKS : मुंबई आणि पंजाब आमने-सामने
मुंबईनं यंदाच्या हंगामातील विजयी सुरुवात उशीरा केली असली, तरी त्यानंतर संघ चांगल्या स्थितीत दिसत आहे. पंजाबने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले असून चार सामने गमावले आहेत. दुसरीकडे मुंबई संघाने आतापर्यंत आठ पैकी चार सामन्यांत विजय मिळवला, तर चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

MI vs PBKS Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघात आतापर्यंत 30 सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही संघांची स्थिती समान आहे. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघांनी प्रत्येकी 15-15 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 200 आहे. 

Mohali Pitch Report : मोहालीची खेळपट्टी कशी आहे?
मोहालीतील (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association) आयएस बिंद्रा स्टेडिअमवर आजचा सामना रंगणार आहे. या मैदानाची  खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आज, 03 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना लखनौमधील इकाना स्टेडिअमवर (Ekana Sport City Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.