PBKS vs KKR, IPL 2023 : कोलकाताचा कर्णधार नितीश राणा याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. नितीश राणे याने पंजाब संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. दोन्ही संघ मोहालीच्या मैदानावर आमनेसामने आहेत. पंजाबचे नेतृत्व अनुभवी शिखर धवन याच्याकडे आहे तर कोलकाताचे नेतृत्व युवा नितीश राणाकडे आहे. 


PBKS vs KKR Live Score : नीतीश राणाच्या नेतृत्वात कसा आहे कोलकाता संघ ? 
रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंह, नीतीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, टिम साउदी, अनुकुल रॉय, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती


PBKS vs KKR Live Score: पंजाब किंग्सचा कसाय संघ ?
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रजा, नाथन एलिस, हरप्रीत बराड, राहुल चाहर, अर्शदीप सिंह 






IPL 2023, PBKS vs KKR : कुणाचं पारड जड?
मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association Stadium) आयएस बिंद्रा स्टेडियमवर (IS Bindra Stadium) आज दुपारी पंजाब (Punjab) आणि कोलकाला (Kolkata) संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघांमधील मागील सामन्यांवर नजर टाकली तर हे संघ आळीपाळीने एकमेकांना पराभूत करत आहेत. गेल्या पाच सामन्यांपैकी केकेआरने तीन सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने दोन सामने गमावले आहेत.  आजच्या सामन्यात पंजाब किंग्सचं पारड काहीसं जड असेल. याचं कारण म्हणजे पंजाब संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. तक दुसरीकडे, कोलकाता संघ आपला नियमित कर्णधार श्रेयस अय्यरशिवाय मैदानात उतरणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर सध्या संघाबाहेर आहे. श्रेयस यानंतरच्या सामन्यामध्ये परतण्याची शक्यता आहे. सध्या केकेआरची कमान नितीश राणाच्या हाती आहे.


कशी आहे खेळपट्टी?


मोहालीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चा वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला.