PBKS vs DC, IPL 2023 Live: पंजाब आणि द्लली यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

PBKS vs DC Live : पंजाबला प्लेऑफमध्ये एन्ट्री घ्यायची असेल तर सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया, या सामन्याचा खेळपट्टीचा अहवाल कसा असेल? 

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 17 May 2023 11:16 PM
दिल्लीचा पंजाबवर 15 धावांनी विजय

दिल्लीचा पंजाबवर 15 धावांनी विजय

पंजाबला सातवा धक्का

हरप्रीत ब्रार धावबाद झालाय..

पंजाबला सहावा धक्का

सॅम करन बाद झालाय.. पंजाबला सहावा धक्का... 

पाचवा धक्का

पंजाबला पाचवा धक्का.. शाहरुख खान बाद

लियाम लिव्हिंगस्टोनचे दमदार अर्धशतक

लियाम लिव्हिंगस्टोनचे दमदार अर्धशतक

पंजाबला चौथा धक्का

पंजाबला चौथा धक्का बसलाय... जितेश शर्मा बाद झालाय

अथर्व तायडे रिटायर्ट आऊट

अर्धशतकानंतर अथर्व तायडे रिटायर्ट आऊट झालाय.

आथर्व तायडे याचे दमदार अर्धशतक

आथर्व तायडे याचे दमदार अर्धशतक

पंजाबला दुसरा धक्का

पंजाबला दुसरा धक्का बसलाय.. प्रभसिमरन बाद झालाय.

अथर्व तायडे-प्रभसिमरन यांनी डाव सावरला

अथर्व तायडे-प्रभसिमरन यांनी डाव सावरला

पंजाबला पहिला धक्का

पंजाबला पहिला धक्का बसलाय.. शिखर धवन बाद झालाय.

पंजाबला विजयासाठी 214 धावांचे आव्हान

रायली रुसो याचे वादळी अर्थशतकाच्या जोरावर दिल्लीने दोन विकेटच्या मोबदल्यात 213 धावांचा डोंगर उभारला. पृथ्वी शॉ यानेही झंझावाती 54 धावांची खेळी केली. त्याशिवाय डेविड वॉर्नर आणि फिल साल्ट यांनी मोलाचे योगदान दिले. पंजाबकडून सॅम करन याने दोन विकेट घेतल्या. पंजाबला विजयासाठी 214 धावांचे आव्हान आहे.

रुसो-साल्टची वादळी फलंदाजी

पंजाबकडून सॅम करन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने दोन विकेट घेतल्या. सॅम करन याच्याशिवाय एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, नॅथन एलिस, राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार यांची विकेटची पाटी कोरीच राहिली. हरप्रीत ब्रार याला 13 च्या सरासरीने धावा कुटल्या.. तर रबाडा आणि एलिसहेही महागडे ठरले. 

सॅम करन सर्वात यशस्वी गोलंदाज

दिल्लीला दुसरा धक्का

दिल्लीला दुसरा धक्का... अर्धशतकानंतर पृथ्वी शॉ बाद

रुसोचे वादळ

रुसोचे वादळी अर्धशतक

पृथ्वी शॉचे दमदार अर्धशतक

पृथ्वी शॉचे दमदार अर्धशतक.. 37 चेंडूत ठोकले अर्धशतक

डेविड वॉर्नरची दमदार खेळी

डेविड वॉर्नरची दमदार खेळी... 31 चेंडूत 46 धावांची खेळी

दिल्लीची अर्धशतकापर्यंत मजल

कर्णधार डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीला दमदार सुरुवात करुन दिली. दिल्ली बिनबाद 51 धावा

दोन्ही संघ धरमशालातील चौथा सामना खेळणार

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघांचा याआधीचा सामना झाला, ज्यात पंजाबनं 31 धावांनी विजय मिळवला. आजचा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे होणार आहे. या मैदानावर दोन्ही संघ यापूर्वी 3 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये पंजाबने 2 विजयांसह आघाडी घेतली आहे, तर दिल्लीनं एक विजय मिळवला आहे. या मोसमातील या मैदानावरील आजचा पहिला सामना असेल.

अशा परिस्थितीत दिल्लीला या मैदानावर पंजाबसोबत स्कोअर सेट करायला आवडेल, तर पंजाब किंग्ज आपली आघाडी कायम राखून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंजाब विरुद्ध दिल्ली Head to Head

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी पंजाबनं 16 आणि दिल्लीनं 15 सामने जिंकले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोघांमध्ये सर्वाधिक 12 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी 6-6 सामने जिंकले आहेत.

पंजाबला प्ले ऑफमध्ये क्लॉलिफाय करण्याची संधी 

पंजाब आपला 13वा साखळी सामना खेळणार आहे. 12 सामन्यांत 6 सामने जिंकल्यानंतर पंजाब 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब आपले दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, दोन्ही सामने जिंकूनही संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. तसेच, संघाचा नेट रनरेट (-0.268) देखील खूप खराब आहे.

कसा असेल खेळपट्टीचा अहवाल? 

आज, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत धर्मशालामध्ये एकही सामना खेळला गेला नाही. बर्फाच्छादित टेकड्यांनी वेढलेल्या या सुंदर क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं तर, इथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी नक्कीच सोयीस्कर असेल. पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सीझनमध्ये आतापर्यंत इथे एकही सामना झालेला नाही, त्यामुळे येथील खेळपट्टीवर खेळण्यासाठी दोन्ही संघांची कसोटी लागणार एवढं मात्र नक्की. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही संघांमधील स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 

पंजाबचे इम्पॅक्ट प्लेअर - 

प्रभसिमरन, सिकंदर रजा, शॉर्ट, ऋषी धवन, राठी Prabhsimran, Raza, Short, R Dhawan, Rathee

दिल्लीचे इम्पॅक्ट प्लेअर -

मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, रिपल पटेल, प्रविण दुबे, सर्फराज

पंजाबची प्लेईंग -- 

शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), सॅम करन, एम शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, दीपक चाहर, कगिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंह

दिल्लीची प्लेईंग 11 - 

डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिल साल्ट, रायली रुसो, अक्षर पटेल, अमन खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिख नॉर्खिया, खलील अहमद

रबाडाची प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री

पंजाबच्या संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. पंजाबने अथर्व तायडे याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. तसेच सिकंदर रजा याच्याजागी कगिसो रबाडाला संधी दिली आहे. 

दिल्लीच्या संघात दोन बदल

दिल्लीच्या संघात दोन मोठे बदल झाले आहे. दिल्लीने पृथ्वी शॉ याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली आहे. त्याशिवाय एनरिख नॉर्खियाही दिल्लीच्या संघात परतलाय. त्याशिवाय पंजाबच्या संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. पंजाबने अथर्व तायडे याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. तसेच सिकंदर रजा याच्याजागी कगिसो रबाडाला संधी दिली आहे. 

दिल्लीची प्रथम फलंदाजी

पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. धर्मशाला मैदानावर शिखर धवन याने प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

पंजाबने नाणेफेक जिंकली

पंजाबने नाणेफेक जिंकली

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 64, PBKS vs DC: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये आजचा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. या सीझनमधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. पहिल्या टप्प्यातील सामन्यात या दोन संघांमध्ये दिल्लीच्या मैदानावर सामना झाला, ज्यात पाहुण्या पंजाब किंग्ज संघानं दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच घरात 31 धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघ पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे, याचा अर्थ ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. 

आयपीएलच्या चालू हंगामात, दिल्ली कॅपिटल्स संघानं आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि यावेळी त्यांना फक्त 4 सामने जिंकता आले आणि 8 सामने गमावले. त्यांचे केवळ 8 गुण आहेत आणि ते पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्जबद्दल बोलायचं तर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघानं आतापर्यंत 12 सामन्यांत 6 सामने जिंकले आहेत आणि 6 सामने गमावले आहेत, ते 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत पंजाब किंग्जला प्लेऑफसाठी अंतिम चारमध्ये आपला दावा ठोकण्याची संधी आहे. पण दिल्लीचा संघ त्यांना हरवू शकतो आणि त्यांना सोबत घेऊन बुडूही शकतो. दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. पण पंजाबला प्लेऑफमध्ये एन्ट्री घ्यायची असेल तर सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया, या सामन्याचा खेळपट्टीचा अहवाल कसा असेल? 

कसा असेल खेळपट्टीचा अहवाल? 

आज, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत धर्मशालामध्ये एकही सामना खेळला गेला नाही. बर्फाच्छादित टेकड्यांनी वेढलेल्या या सुंदर क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं तर, इथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी नक्कीच सोयीस्कर असेल. पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सीझनमध्ये आतापर्यंत इथे एकही सामना झालेला नाही, त्यामुळे येथील खेळपट्टीवर खेळण्यासाठी दोन्ही संघांची कसोटी लागणार एवढं मात्र नक्की. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही संघांमधील स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 

पंजाबला प्ले ऑफमध्ये क्लॉलिफाय करण्याची संधी 

पंजाब आपला 13वा साखळी सामना खेळणार आहे. 12 सामन्यांत 6 सामने जिंकल्यानंतर पंजाब 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब आपले दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, दोन्ही सामने जिंकूनही संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. तसेच, संघाचा नेट रनरेट (-0.268) देखील खूप खराब आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PBKS vs DC Match Preview: दिल्ली अन् पंजाबमध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या, आकडेवारी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.