नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील कालच्या मॅचमधील संजू सॅमसनच्या विकेटवरुन निर्माण झालेला वाद काही थांबवण्याचं चित्र नाही. संजू सॅमसन बाद होता की नव्हता या संदर्भातील वाद सुरुच आहे. संजूच्या विकेट संदर्भात आता माजी क्रिकेटपटूंची भूमिका समोर येत आहे. भारतीय क्रिकेट टीमचे माजी खेळाडू नवजोत सिंह सिद्धूनं त्याचं मात मांडलं आहे. सिद्धूनं संजू सॅमसन नाबाद असल्याचं म्हटलं. कॅच घेताना होपचा पाय दोनवेळा बाऊंड्रीला लागल्याचं त्यांनी म्हटलं. 


होपचा पाय दोनवेळा बाऊंड्रीला लागला


सिद्धूनं स्टार स्पोर्टस सोबत बोलताना म्हटलं की, "ज्या निर्णयानं मॅच चा निकाल बदलला ता निर्णय संजू सॅमनसच्या विकेटचा होता. वैचारिक मतभेद असू शकतात मात्र तुम्ही साइड अँगलनं पाहिलं असता होपचा पाय दोनवेळा बाऊंड्रीला लागला होता. हे स्पष्ट आहे की तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत नाही किंवा तुम्ही ते वापरत असून तंत्रज्ञान चूक करत आहे. हे म्हणजे असं झालं की दुधात माशी पडलेली असून लोक तुम्हाला दूध पिण्यास सांगतात, असं सिद्धू म्हणाला. 


शाई होपचा पाय दोनवेळा बॉउंड्रीला लागला होता. यानंतर कुणी म्हटलं  की संजू सॅमसन आऊट आहे. तर, मी तटस्थ माणूस म्हणून सांगतो की मी पाहिलं त्यानुसार संजू सॅमसन नाबाद होता, असं  सिद्धू म्हणाला. 


संजूच्या विकेटनंतर मॅच फिरली


दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 विकेटवर 221 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सकडून जॅक फ्रेजर मॅक्गर्क, अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्सनं केलेल्या दमदार फलंदाजीमुळं 221 धावांचा टप्पा गाठला होता. या धावांचा पाठलाग करताना जोपर्यंत संजू सॅमसन मैदानावर होता तोपर्यंत राजस्थान रॉयल्स भक्कम स्थितीत होती. राजस्थानला अखेरच्या पाच ओव्हरमध्ये 61 धावांची गरज होती. मात्र, राजस्थानच्या संघानं या पाच ओव्हरमध्ये पाच विकेट गमावल्या आणि त्यांना 41 धावा करता आल्या. संजू समॅसन 86 धावांवर बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव कोलमडला. 20 ओव्हरमध्ये राजस्थानच्या संघाला 8 बाद 201 धावा करता आल्या. 


दरम्यान, संजू सॅमसनच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे  दिल्ली कॅपिटल्सनं पाचव्या स्थानावर झेप घेतलीय.  दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पुढील दोन मॅच मोठ्या फरकानं जिंकणं आवश्यक आहे. 


संबंधित बातम्या :


Sanju Samson : अम्पायरसोबत वाद घालणं भोवलं, संजू सॅमसनला डबल धक्का, बीसीसीआयची मोठी कारवाई


राजस्थान रॉयल्सला दणका, दिल्ली कॅपिटल्सला प्ले ऑफमध्ये एंट्री मिळू शकते ? रिषभच्या टीमला नेमकं काय करावं लागणार?