नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) 20 धावांनी पराभूत करत प्लेऑफमधील प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयपीएलच्या 17 व्या पर्वातील 56 वी मॅच पार पडली. दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 विकेटवर 221 धावा केल्या होत्या. राजस्थाननं 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 201 धावांपर्यंत मजल मारली. 


दिल्लीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 221 धावा केल्या यामध्ये जॅक फ्रेजर मॅक्गर्क, अभिषेक पोरेल आणि ट्रिस्ट स्टब्स यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं 20 बॉलमध्ये 50 धावा, अभिषेक पोरेलनं 36 बॉलमध्ये 65 धावा तर ट्रिस्टन स्टब्सनं 20 बॉलमध्ये 41 धावा केल्या.


राजस्थान रॉयल्सनं या धावसंख्येचा पाठलाग करताना 201 धावा केल्या. संजू सॅमसननं 46 बॉलमध्ये 81 धावा केल्या. यामध्ये त्यानं सहा सिक्स आणि आठ फोर मारले. दिल्लीच्या मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी मोक्याच्या क्षणी राजस्थानला धक्के देत प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. 



राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये आठ मॅच जिंकल्या असून त्यांच्या नावावर 16 गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. दिल्लीनं राजस्थानला पराभूत केल्यानंतर ते सध्या पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. दिल्लीनं 6 मॅच जिंकल्यानं त्यांच्याकडे 12 गुण असून त्यांचं नेट रनरेट -0.316 इतकं आहे. 


दिल्लीचं प्ले ऑफच्या प्रवेशाचं गणित नेमकं काय?


दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असल्यास त्यांना राहिलेल्या दोन मॅचेस जिंकाव्या लागतील. दिल्लीनं राहिलेल्या दोन मॅच जिंकल्यास त्यांच्याकडे 16 गुण असतील. मात्र, एवढ्यावर  त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यांचं नेट रनरेट देखील चांगलं असणं आवश्यक आहे. याशिवाय दिल्लीचं भवितव्य चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यावर अवलंबून असेल. या तिन्ही संघांचे गुण सारखेच आहेत. या तीन पैकी दोन संघांना पुढील मॅचमध्ये एकही विजय न मिळाल्यास ते 12 गुणांवर राहू शकतात. याचा फायदा दिल्लीला होऊ शकतो.  दिल्ली कॅपिटल्सची पुढील मॅचेस रविवारी 12 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि 14 मे रोजी लखनौ सुपर जाएंटस यांच्या विरोधात असतील.


दरम्यान, दिल्लीसाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात निराशानजक ठरली होती. मात्र, रिषभ पंतच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्सनं कमबॅक केलं आहे. दिल्लीनं आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीतील त्यांचं आव्हान अद्याप काय ठेवलंय. 


संबंधित बातम्या : 


रोहित शर्माला वर्ल्ड कपपूर्वी ब्रेकची गरज पण त्याला तो मिळणार नाही, हिटमॅनला एकच काम करावं लागेल, मायकल क्लार्कचं मोठा दावा


RR vs DC : संजू सॅमसननं दिल्लीच्या विजयाचं क्रेडिट कुलदीप, मॅक्गर्क नव्हे तिसऱ्याच खेळाडूला दिलं...